CM Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ आज अयोध्या दौऱ्यावर, राम मंदिर निर्माणच्या कामाचा आढावा घेणार
आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येला भेट देणार आहेत. योगी रामलला आणि हनुमानगढीची ते पुजा करणार आहेत.
CM Yogi Adityanath : अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम जोरात सुरु आहे. रामनवमीची तयारीही सध्या सुरु आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येला भेट देणार आहेत. योगी रामलला आणि हनुमानगढीची ते पुजा करणार आहेत. त्यानंतर चैत्र रामनवमी मेळ्यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठकही योगी आदित्यनाथ घेणार आहे. तसेच योगी आज अयोध्येतील काही ज्येष्ठ संतांचीही भेट घेणार आहेत. यानंतर ते बलरामपूरला जातील, तेथे ते माता पटेश्वरी देवीच्या मंदिरात पुजा करणार आहेत. त्यानंतर उद्या (2 एप्रिल) सिद्धार्थनगर आणि वाराणसीच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
डिसेंबर 2023 मध्ये रामलला मंदिरात विराजमान होणार
मंदिराच्या उभारणीला विलंब होऊ नये, यासाठी जयपूर-राजस्थानच्या कारखान्यातून कोरलेले दगड अयोध्येत येऊ लागले आहेत. एका ट्रकमध्ये केवळ 5 ते 6 दगड आणले जात आहेत. जेणेकरुन कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये. अशा सुमारे 200 कोरीव दगडांची खेप राम मंदिराच्या आवारात पोहोचली आहे. फरशीनंतर गर्भगृहाचे बांधकाम सुरु होईल. डिसेंबर 2023 मध्ये रामलला मंदिरात विराजमान होतील आणि त्यानंतर भक्तांना देवाचे दर्शन घेता येईल. दरम्यान, पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी आज पहिल्यांदाच अयोध्येला भेट देणार आहेत. राम मंदिराच्या उभारणीदरम्यान रामललाच्या तात्पुरत्या मंदिरात नवरात्री आणि रामनवमीची तयारीही जोरात सुरु आहे.
दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं आहे. चार राज्यात भाजपला सत्ता मिळाली आहे. यातील महत्त्वाचे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. गेल्या 25 मार्चला योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. योगी यांची दुसरी इनिंग सुरु झाली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच योगी आदित्यनाथ अयोध्येला भेट देणार आहेत. आज योगी आदित्यनाथ रामललाचे दर्शन घेणार आहेत. तसेच राम मंदिर उभारणीच्या कामाची पाहणी देखील योगी आदित्यनाथ करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: