UP Government Cabinet Portfolio : उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्र्यांमध्ये विभागांची विभागणी करण्यात आली आहे. यावेळी पुन्हा विजयी होऊन सत्तेत आलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गृह, माहितीसह अनेक महत्त्वाची मंत्रालये आपल्याकडे ठेवली आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना ग्रामीण विकासासह सहा विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्याकडे आरोग्य, शिक्षण या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
योगी सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे ग्रामीण विकास आणि एकूणच ग्रामीण विकास, ग्रामीण अभियांत्रिकी, अन्न प्रक्रिया, करमणूक कर, सार्वजनिक उपक्रम आणि राष्ट्रीय एकात्मता विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, वैद्यकीय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि माता आणि बालकल्याण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कोणतं मंत्रिपद कोणाला मिळालं?
ब्रजेश पाठक - आरोग्य आणि औषध मंत्री
स्वतंत्र देव सिंह - जलशक्ती मंत्री
लक्ष्मीनारायण चौधरी - ऊस विकास मंत्री
धरमपाल - पशुधन आणि दूध विकास मंत्री
जितीन प्रसाद - सार्वजनिक बांधकाम मंत्री
केशवप्रसाद मौर्य - ग्रामीण अभियांत्रिकी मंत्री
बेबी राणी मौर्या - महिला कल्याण मंत्री
ए.के.शर्मा - शहर विकास मंत्री, अतिरिक्त ऊर्जा विभाग
नितीन अग्रवाल - उत्पादन शुल्क मंत्री
कपिलदेव अग्रवाल - व्यावसायिक शिक्षण मंत्री
दयाशंकर सिंह - वाहतूक मंत्री
आशिष पटेल - तंत्रशिक्षण मंत्री
संजय निषाद - मत्स्यपालन मंत्री
असीम अरुण - समाज कल्याण, अनुसूचित जाती आणि मनुष्यबळ कल्याण मंत्री
सुरेश खन्ना - अर्थ आणि संसदीय मंत्री
सूर्य प्रताप शाही - कृषी मंत्री
जयवीर सिंग - पर्यटन मंत्री
नंद गोपाल नंदी - औद्योगिक विकास आणि निर्यात मंत्री
भूपेंद्र चौधरी - पंचायत राज मंत्री
अनिल राजभर - कामगार आणि रोजगार समन्वय मंत्री
ए. के. शर्मा - नगरविकास आणि नागरी सर्वांगीण विकास मंत्री
योगेंद्र उपाध्याय - उच्च शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री
धरमवीर प्रजापती - कारागृह आणि गृहरक्षक मंत्री
संदीप सिंह - मूलभूत शिक्षण मंत्री
गुलाब देवी - माध्यमिक शिक्षण मंत्री
दयाशंकर मिश्रा - आयुष आणि अन्न सुरक्षा मंत्री
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Bharat Band : भारत बंदचा दुसरा दिवस, पहिल्या दिवशी काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत; आरोग्य सेवांवर परिणाम नाही
- PM Modi : 1 एप्रिल रोजी दिल्लीत 'परीक्षा पे चर्चा', पंतप्रधान मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
- Bengal Assembly : बंगाल विधानसभेत गोंधळ, भाजप आणि तृणमूल आमदारांमध्ये हाणामारी, एकमेकांचे कपडे फाडले
- Amaranth Yatra : 30 जूनपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा, 43 दिवस चालणार, कोरोनामुळे यात्रा दोन वर्षे होती रद्द
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha