Bengal Assembly : पश्चिम बंगाल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गदारोळ पाहायला मिळाला. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. इतकच नाही तर आमदारांनी भांडणामध्ये एकमेकांचे कपडेही फाडले. बीरभूम हिसांचाराच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केल्यावर तृणमूल काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले यानंतर भाजप आणि टीएसमी आमदारांमध्ये भांडण झाले, असा आरोप भाजपने केला आहे. यादरम्यान भाजप आमदार मनोज तिग्गा यांना मारहाण करण्यात आली.


गदारोळानंतर भाजप आमदारांनी सभा त्याग केला. या हाणामारीत टीएमसी आमदार असित मजुमदार यांच्या नाकाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. मजुमदार यांना एसएसकेएममध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे. या घटनेनंतर भाजपच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले असून यामध्ये शुभेंदू अधिकारी, मनोज तिग्गा, शंकर घोष, दीपक बर्मन आणि नरहरी महतो यांचा समावेश आहे.






 


यानंतर भाजप आमदारांनीही विधानसभेबाहेर निदर्शने केली. सभागृहात निषेधादरम्यान सुरक्षा रक्षकांनी आपल्यावर हल्ला केला आणि ढकलले, असा आरोप भाजप आमदारांनी केला आहे. भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, भाजप आमदारांना धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यांचे कपडे फाडण्यात आले.


बीरभूम हिंसाचार प्रकरणी भाजपने सभागृहात चर्चेची मागणी केली आणि त्यानंतर विरोध सुरू झाला. यानंतर सभागृहातील परिस्थिती बिघडली आणि दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha