एक्स्प्लोर

UP BOARD RESULT| दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल जाहीर; दहावीत रिया जैन तर 12वीत अनुराग मलिक टॉपर

उत्तर प्रदेश बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना हे निकाल पाहता येणार आहेत.

लखनऊ : उत्तर प्रदेश बोर्डाच्या (UPMSP) दहावी आणि बारावीचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे हे निकाल एक महिना उशिरा जाहीर करण्यात आले आहेत. दहावी आणि बारावीचे निकाल उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी जाहीर केले. विद्यार्थ्यांना हे निकाल उत्तर प्रदेश बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहेत. विद्यार्थी वेबसाइटच्या होम पेजवरच निकाल पाहू शकणार आहेत. उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांचा म्हणणं आहे की, यावर्षीचा निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगला लागला आहे.

दरम्यान, दहावीचे 83.31 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. यंदाही मुलींनी बजी मारली आहे. दहावी आणि बारावीच्या निकालांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची कामगिरी उत्तम असल्याचं पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी सांगितल्यानुसार, उत्तर प्रदेशमध्ये 52 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तसेच पुढे ते म्हणाले की, फक्त 21 दिवसांमध्ये उत्तरपत्रिका तपासण्याचं एक आव्हानच होतं.

दिनेश शर्मा पुढे बोलताना म्हणाले की, 'यावेळी एकत्रच 18 फेब्रुवारी रोजी दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु करण्यात आल्या होत्या. दहावीच्या परीक्षा 3 मार्च रोजी आणि इंटरची परीक्षा 6 मार्च रोजी संपली.'

बागपतची रिया जैन 10वीत टॉप यंदा बडौत-बागपतची रिया जैन ही दहावीत पहिली आली आहे. रियाला 96.67 टक्के मार्क्स मिळाले आहेत. तर अभिमन्यु वर्मा हा राज्यात दुसरा आला असून त्याला 95.83 टक्के मार्क्स मिळालेत. तर योगेश प्रताप सिंह आणि राजेंद्र प्रताप सिंह या दोन विद्यार्थ्यांनी 95.33 टक्के मार्क्स घेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. 12वीत अनुराग मलिक प्रथम बारावीच्या परीक्षेत बागपतच्या श्री राम एसएम इंटर कॉलेज बागपतच्या अनुराग मलिकने 97 टक्के मार्क्स घेत पहिला क्रमांक पटकावला आहे. एसपी इंटर कॉलेज, शिकरो प्रयागराजच्या प्रांजल सिंह हिने 96% गुणांसह दुसरा तर श्रीगोपाल इंटर कॉलेज औरैयाच्या उत्कर्ष शुक्लाने 94.80 टक्के गुणांसह तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.

या वेबसाइट्सवर पाहा रिझल्ट :

रिझल्ट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑफिशिअल वेबसाइटवर आपला सात अंकी रोल नंबर आणि शाळेचा क्रमांक टाकावा लागेल. उत्तर प्रदेश बोर्डाचे दहावीचे रिझल्ट पाहण्यासाठी खालील वेबसाइट्सला भेट देऊ शकता.

www.upmsp.edu.in

www.upmsp.nic.in

www.upresults.nic.in www.upmspresults.up.nic.in.

ABP Newsच्या वेबसाइटवरही तुम्ही रिझल्ट पाहू शकता :

उत्तर प्रदेश बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त विद्यार्थी ABP Newsच्या वेबसाइटवरही विद्यार्थी रिझल्ट पाहू शकणार आहेत. त्यासाठी इयत्ता दहावीचे विद्यार्थी up10.abplive.com. आणि इयत्ता बारावीचे विद्यार्थी up12.abplive.com या संकेतस्थाळावर जाऊन आपला रिझल्ट पाहू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या : 

यूपी बोर्डाचा दहावी,बारावीचा निकाल घोषित, इथं पाहू शकता रिझल्ट

महत्त्वाच्या बातम्या

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
CJP Protest : 30 हजार जवान तैनात, 200 जण ताब्यात, सीजेपीच्या आंदोलनाला रोखण्यासाठी सरकारनं आतापर्यंत कोणती पावलं उचलली?
30 हजार जवान तैनात, 200 जण ताब्यात, सीजेपीच्या आंदोलनाला रोखण्यासाठी सरकारनं आतापर्यंत कोणती पावलं उचलली?
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
Internet Ban : मोठी बातमी, मध्य दिल्लीतील इंटरनेट 24 तासांसाठी बंद राहणार, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा निर्णय
मध्य दिल्लीतील इंटरनेट 24 तासांसाठी बंद राहणार, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget