अखेर हा प्रकार सुरु कसा झाला?
बलियाचे जिल्हाधिकारी भवानी सिंह यांनी दलित नेत्यांच्या महागड्या बुटांवर टिप्पणी केली होती. ही गोष्ट आहे 22 ऑगस्टची. बैठक सोडून ते रामपूरच्या सरकारी शाळेत पोहोचले होते. तर बसपाचे काही नेतेही उपस्थित होते. बाहेर लक्झरी गाड्याही उभ्या होत्या. लखनौमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी भवानी सिंह सर्व काम सोडून शाळेत आले होते. शाळेतील एका व्हिडीओवरुन मोठा वाद झाला होता. या शाळेत दलित मुलांना बाजूला बसवून माध्यान्न भोजन दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी ट्वीट करुन योगी सरकारवर निशाणार साधला होता. या प्रकाराच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना शाळेत तातडीने पाठवलं होतं.
मात्र बसपाच्या नेत्यांना पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी भवानी सिंह यांचा तीळपापड झाला. ते म्हणाले की, महत्त्वाची बैठक सोडून मला इथे यावं लागलं. पण तुमच्यासारखे नेते राजकारण करत आहेत. 25 लाखांची गाडी, 20 हजाराचं घड्याळ आणि 10 हजारांचे बूट घालून राजकारण करु नका, असं ते म्हणाले. मात्र तिथे उपस्थित बसपाचे क्षेत्रीय समन्वयकांनी याचा विरोध केला. आरोप-प्रत्यारोपाचा हा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला.
यानंतर बलियाच्या जिल्हाधिकारी भवानी सिंह यांच्याविरोधात दलित समाजाच्या लोकांनी अभियान सुरु केलं आहे. लोक आपापल्या पद्धतीने विरोध दर्शवत आहेत. काही जण नव्या बुटांचे फोटो पोस्ट करत आहेत, तर काही जण जुन्या बुटांचे. तर काही जणांनी आपल्या गाडीसोबतचे फोटो पोस्ट करत आहेत. इतकंच नाही तर काहींनी बूट खरेदी करुन जिल्हाधिकाऱ्यांना कुरिअरही केले आहेत.