नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक 5 अंतर्गत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. (Unlock 5 Guidelines) अनलॉक पाचमध्ये 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, चित्रपटगृह उघड्यास परवानगी दिली आहे. मात्र, थिएटरमध्ये 50 टक्केचं प्रेक्षकांना परवानगी असणार आहे. मार्च महिन्यापासून शाळा, चित्रपटगृह बंद आहेत. आता त्यांना उघडण्यास परवानगी दिली  आहे. दरम्यान, आज चित्रपटगृह सुरु करण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या लागू केल्यापासून बंद असलेली चित्रपटगृहे आता लवकरच सुरु होणार आहेत. केंद्र सरकारतर्फे चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, चित्रपटगृहात सुरुवातीला केवळ 50 टक्केच प्रेक्षकांना उपस्थिती देता येणार आहे. सिनेमा, थेटर्स, मल्टीप्लेक्स टॉकीज 15 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.





चित्रपटगृह सुरु करण्यासाठी नियमावली :






    • चित्रपटगृहात केवळ 50 टक्के प्रेक्षकांची उपस्थिती बंधनकारक

    • चित्रपट पाहताना आसनव्यवस्थेत फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक असणार आहे.

    • आसनव्यवस्था राखीव ठेवू नये

    • प्रेक्षकांना हँडवॉश किंवा हँड सॅनिटायझर पुरवण्यात यावं

    • आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्याचा सल्ला प्रेक्षकांना देण्यात यावा

    • थर्मल स्क्रिनिंग करावी, केवळ लक्षणं नसलेल्या व्यक्तींनाचा चित्रपटगृहांमध्ये प्रवेश देण्यात यावा






राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु


राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. राज्यातील सुमारे चार लाख रेस्टॉरंट, हॉटेल आणि बार पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार बंद होते. मात्र अनलॉक 5 मध्ये राज्य सरकारने नियम आणि अटींसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्यास परवानगी दिली. यासाठी राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल पुन्हा सुरु करण्यासाठी नियमावलीही जाहीर केली आहे. त्यामुळे 50% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करण्यात आले आहेत. यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणार आहे.


काय आहे राज्याच्या अनलॉक 5 मध्ये?




  • अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग ही सुरु करण्यास परवानगी

  • राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरु करायला परवानगी

  • ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर कसलेही निर्बंध नाही

  • डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी

  • मुंबई महानगर प्रदेश MMR मधील लोकल फेऱ्या वाढवाव्या

  • पुणे विभागातील लोकलवट्रेन सुरू होणार


महत्त्वाच्या बातम्या : 

Unlock 5 Guidelines Released : केंद्राकडून शाळा, चित्रपटगृह, स्विमींग पूल सुरू करण्यास परवानगी, मात्र..