नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीवरुन देशभरातील वातावरण तापलं आहे. देशातील विविध भागात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन) विरोधात आंदोलनं होतं आहेत. या दरम्यान केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. देशाला धर्मशाळा बनवायचं आहे का? भारत माता की जय बोलतील, त्यांनाच भारतात राहता येईल, असं आपल्याला निश्चित करावं लागेल, असं वक्तव धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे.


अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतेच्या एका कार्यक्रमात धर्मेद्र प्रधान नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीबद्दल बोलत होते. धर्मेंद्र प्रधान यांनी याठिकाणी भाषण करताना तेथील उपस्थितांना विचारणा केली, की तुम्हाला भारताची धर्मशाळा बनवयाची आहे का? ज्याठिकाणी कुणीही कधीही यावं आणि कुणीही राहावं. शहीद भगत सिंह, सुभाषचंद्र बोस यांच्या सारख्या महापुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. या सर्वांना आठवून आपल्याला एक निर्णय घेतला पाहिजे की, भारतात केवळ तेच लोक राहू शकतात जे 'भारत माता की जय' बोलण्यास तयार आहेत.





नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीवरुन देशभरात अनेक ठिकाणी आंदोलने झाली, काही ठिकाणी अजुनही आंदोलने सुरु आहेत. काही आंदोलनांमध्ये हिंसाचारही झाला. 15 डिसेंबरला दिल्लीतील जामिया विद्यापीठातील हिंसाचारातनंतर देशभरात अनेक हिंसक आंदोलने झाली. उत्तर प्रदेश, बंगळुरु येथे हिंसाचारात काही जणांचा मृत्यूही झाला.


संबंधित बातम्या




EXPLAINER VIDEO | नागरिकत्व कायद्यावरुन उद्भवलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर