पोलिसांनी वाटेत अडवत गळा दाबत धक्काबुक्की केल्याचा आरोप प्रियंका गांधींनी केलाय. दरम्यान पोलिसांच्या विरोधानंतर स्कुटीवरुन प्रवास करावा लागल्याचा दावा प्रियंका गांधींनी केला आहे. नागरिकत्व संशोधन कायद्याचा विरोध करताना झालेल्या हिंसक आंदोलनप्रकरणी पोलिसांनी माजी आयपीएस एस. आर. दारापुरी आणि काँग्रेस प्रवक्ता सदफ जफर यांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर जफर यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी जात होत्या.
सीएए आणि एनआरी विरोधात काँग्रेस आक्रमक -
देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात आंदोलन सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानेही आक्रमक भूमिका घेत यात उडी घेतली आहे. काँग्रेसच्या स्थापना दिवसाचं औचित्य साधत काँग्रेसनं शुक्रवारी मुंबईत सीएए आणि एनआसी कायद्याविरोधात शांतीमार्च काढला. गवालिया टँकजवळच्या तेजपाल हॉल ते गिरगाव चौपाटीपर्यंत हा मार्च काढण्यात आला. काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, एकनाथ गायकवाड या मोर्चाला हजर होते. काँग्रेसची युवा टीमही या मोर्चात प्रामुख्यानं दिसली. यात विश्वजित कदम, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, अमित देशमुखांसह सर्व युवा नेते उपस्थित होते.
दिल्लीतील भारत बचाओ रॅलीच्या यशानंतर विविध राज्यात मार्चचं आयोजन करण्यात आले. मोदी सरकारच्या धोरणांवर टीका आणि विरोध करण्याचा या मार्चचा उद्देश होता. या मार्चदम्याम्यान काँग्रेसकडून अनेक मुद्द्यांवर आवाज उठवण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि दिल्लीतील जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीवर जोर देण्यात आला.
हेही वाचा - काँग्रेस स्थापना दिनानिमित्त विविध राज्यांमध्ये 'संविधान बचाओ, भारत बचाओ' मार्चचं आयोजन
Priyanka Gandhi | लखनौ पोलिसांनी गळा दाबून धक्काबुक्की केली : प्रियंका गांधी | ABP Majha