देशात कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. अशातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की 146 जिल्हे विशेष चिंता निर्माण करणार आहेत. ते म्हणाले की 308 जिल्ह्यांमध्ये कोरोनावर नियंत्रण आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, सध्या भारतात 21 लाख 57 हजार सक्रीय रुग्ण आहेत, जे मागील वर्षाच्या तुलनेत दोन पट आहेत. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, रेल्वे 1200 बेड देत आहे. याव्यतिरिक्त, डीआरडीओने 500 बेड तयार केले आहेत. केंद्र सरकारने 2005 बेडमध्ये वाढ केली आहे. यासह कोरोना मृत्यूदरही कमी होत आहे.
13 कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण
आरोग्य सचिव म्हणाले की, आतापर्यंत देशात 13 कोटीहून अधिक लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. त्यापैकी 30 लाख लोकांना गेल्या 24 तासांत लस देण्यात आली. आतापर्यंत 87 टक्के आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की कोरोना लस औषध विक्रेत्यांकडे मिळणार नाही. सरकार राज्यांना लस देत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही लस केवळ सरकारी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल. मंत्रालयाकडून पुढे सांगण्यात आले की ही लस घेण्यासाठी सर्व लोकांना कोविन-अॅपवर नोंदणी करावी लागेल.
"लसीकरणानंतर किती पॉझिटिव्ह"
देशात कोवाक्सिनचे 1.1 कोटी डोस देण्यात आले, त्यापैकी 4,208 लोकांना पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली आहे तर दुसरा डोस घेतल्यानंतर 695 लोक संक्रमित झाले.कोविशिल्ड लस देशातील 11.6 कोटी लोकांना देण्यात आली, त्यापैकी 17,145 पहिल्या डोसनंतर आणि दुसऱ्या डोसनंतर 5014 लोकांना कोरोनाची बाधा झाली.