नवी दिल्ली : दिव्यांग आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुलभ करण्यासाठी आता आणखी एक पाऊल उचलण्यात येत आहे. दिव्यांग आणि ज्यांचं अद्याप लसीकरण झालं नाही किंवा ज्यांनी आतापर्यंत केवळ पहिला डोस घेतलाय अशा 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी आता त्यांच्या राहत्या घराजवळच लसीकरण केंद्र उभारण्याची सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिली आहे. 


नॅशलन एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड 19 या समितीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिव्यांग आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी  निअर टू होम कोविड वॅक्सिन सेंटर (NHCVC) उभारण्याची शिफारस केली होती. ती शिफारस आता केंद्राने मान्य केली असून सर्व राज्यांना निअर टू होम कोविड वॅक्सिन सेंटर सुरु करण्याची सूचना दिली आहे. 


निअर टू होम कोविड वॅक्सिन सेंटर (NHCVC) साठी पात्र नागरिक
1. 60 वर्षापरील सर्व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, ज्यांचं अद्याप लसीकरण झालं नाही किंवा एक डोस घेतला आहे. 
2. सर्व दिव्यांग नागरिक


 




सरकारच्या या निर्णयामुळे सर्व दिव्यांगाना आणि ज्येष्ठ नागरिकांना आता त्यांच्या राहत्या घराजवळच कोरोनाची लस उपलब्ध होणार आहे. या गटाची शारीरिक स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन गटांव्यतिरिक्त इतर कोणालाही निअर टू होम कोविड वॅक्सिन सेंटरमध्ये लस मिळणार नाही. इतर सर्व वयोगटातील लोकांचे लसीकरण नेमूण देण्यात आलेल्या ठिकाणीच होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 


महत्वाच्या बातम्या :