नवी दिल्ली : इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम आता मराठीमध्ये उपलब्ध होणार आहे. अभ्यासक्रमामध्ये सुरुवातीला स्वयम् ने डेव्हलप केलेल्या सॉफ्टवेअरची मदत घेणार असल्याची माहिती आहे. वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर उपलब्ध आहे.  अभ्यासक्रमात भाषांतराचा अति हट्ट नसेल. वैज्ञानिक संकल्पना इंग्रजीत समजून घ्यायला सोपे असल्याने त्या तशाच राहतील फक्त कन्सेप्ट समजून देण्यासाठी प्रादेशिक भाषा वापरली जाणार आहे. 


जगातल्या इतर अनेक देशांमध्ये त्या त्या भाषांमध्येच इंजीनियरिंग उपलब्ध आहे. चीन, जपान, जर्मनीमध्ये अशाच पद्धतीनं इंजिनियरिंग शिकवली जाते. नव्या शैक्षणिक धोरणांमध्ये प्रादेशिक भाषात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे, त्यानुसार ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन हे पाऊल उचलले आहे.


आत्तापर्यंत पाच भाषांमध्ये प्रतिसाद मिळाला आहे. ही संख्या वाढवून अकरा पर्यंत न्यायची आहे यावर्षी देशातल्या 14 कॉलेजेस मध्ये मराठीसह पाच भाषांमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध असेल . महाराष्ट्रात दोन कॉलेजने इच्छा दर्शवली आहे. आता याला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा मिळतो हे पाहावे लागेल.