नवी दिल्ली : कोरोना लसीमुळे आतापर्यंत कुणाचाही मृत्यू झालेला नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी ही माहिती दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी सीएसआयआर-सीएसआयओ चंदीगड येथे सेंटर फॉर एक्सलन्स फॉर इंटेलिजेंट सेन्सर अँड सिस्टिम्स येथे माध्यमांशी संवाद साधला. कोरोना लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. लसीकरणामुळे आतापर्यंत कुणाचा मृत्यू झालेला नाही. ज्या मृत्यूची नोंद झाली आहे, तज्ञांच्या पथकाद्वारे राष्ट्रीय पातळीवर चौकशी केली जाते, असं हर्ष वर्धन यांनी म्हटलं. 


लसीकरणाचा फीडबॅक चांगला


इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार डॉ. हर्ष वर्धन यांनी राष्ट्रीय स्तरावर लसीकरणासंदर्भातील फीडबॅकबद्दल सांगितले की, “लसीकरणाचा फीडबॅक खूप चांगला आहे. आज सकाळपर्यंत 4.5 कोटी डोस दिले गेले आहेत. 76 देशांना 6 कोटी डोस देखील दिले आहेत. त्यामुळे केवळ आपला भारतच नाही तर आपण संपूर्ण जगाला मदत करत आहोत. लस देण्याचे कामही जन आंदोलना सारखंच केले जात आहे. आता लसीबाबतची भीतीही  कमी झाली आहे. आम्ही लोकांना लसीबाबत माहिती देण्यासाठी देखील एक मोहीम राबवत आहोत, असं हर्ष वर्धन यांनी सांगितलं. 


Maharashtra Corona Cases Update | राज्यात नव्या कोरोना रुग्णांचा चढता आलेख; आज आढळले इतके रुग्ण...


कोरोनाची दुसरी लाट नाही


कोरोना व्हायरसचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने होत आहे. आपण त्याला काहीही नाव देऊ शकतो, मात्र ही कोरोनाची दुसरी लाट नाही. कोरोनावरील उपचार फार कठीण नाहीत. योग्यप्रकारे मास्क घालण्याव्यतिरिक्त उत्तम काही नाही. जर मास्क व्यवस्थित घातला असेल तर कोरोनाचा प्रसार होणार नाही. कारण तो हवेत जास्त काळ राहत नाही. जर सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क हे नियम पाळले तर कोरोनाची साखळी तोडून त्यावर नियंत्रण मिळवता येणे सहज शक्य आहे. आकडेवारीवरून असेही दिसून आले आहे की कोविडच्या सर्व नियमांचे पालन केल्यावर, इतर वायूजन्य आजारांमध्येही घट झाली आहे. जपानमधील लोकही दररोजच्या या वागण्याचे पालन करतात. प्रदूषणापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठीही मास्क उपयोगी आहे, असं हर्ष वर्धन यांनी म्हटलं. 


Corona | मुंबईत कोरोना रुग्णांसंख्येत धडकी भरवणारी वाढ


कोविड गाईडलाईन्सचं पालन करणे आवश्यक 


आपण गेल्या वर्षभरापासून कोरोनाविरुद्ध लढाई लढत आहोत. सर्व राज्यांना  मानक ऑपरेटिंग प्रक्रिया किंवा मानक कार्यप्रणाली (एसओपी) पाठवल्या गेल्या आहेत, सर्वांना माहिती आहे की  टेस्टिंग आणि ट्रेसिंग आणि वेगवान उपचार करावे लागतील.