एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO : केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांची उघड्यावर लघवी
नवी दिल्ली : ज्या सरकारसाठी स्वच्छ भारत अभियान ही सर्वात महत्वाकांक्षी योजना आहे, त्याच सरकारमधील ज्येष्ठ मंत्री या योजनेला अगदी खुलेआम हरताळ फासताना दिसत आहेत. देशाचे कृषीमंत्री राधामोहन सिंह हे त्यांच्या एका नव्या पराक्रमानं पुन्हा चर्चेत आलेत. मंत्रीमहोदय कसलीही भीडभाड न बाळगता सार्वजनिक ठिकाणी मूत्र विसर्जन करतानाचा फोटो समोर आलाय. या फोटोत त्यांच्याभोवती कडक सुरक्षाव्यवस्था, लाल दिव्याची गाडीही दिसत आहे.
बिहारमधल्या मोतीहारी या त्यांच्या मतदारसंघातलाचा हा फोटो असावा असा अंदाज आहे. पण तो नेमका कधीचा आहे, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. आज राष्ट्रीय जनता दल या लालू प्रसाद यादव यांच्या पक्षानं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन आज हा फोटो समोर आणला. लालू प्रसाद यादव हे त्यांच्या विनोदबुद्धीबद्दल सुपरिचित आहेतच, पण या कलेचा वारसा त्यांच्या पक्षालाही मिळाल्याचं दिसतंय. त्यामुळेच अतिशय खोचक, उपहासात्मक शैलीतला संदेश या फोटोसोबत देण्यात आलाय. ( कड़ी सुरक्षा के बीच केंद्रीय कृषि मंत्री सुखाड प्रभावित क्षेत्र मे सिंचाई योजना की शुरुआत करते हुए। उन्होंने स्वच्छ भारत अभियान को भी गति दी)
https://twitter.com/RJDforIndia/status/880145449813921792
पाहा व्हिडिओ :
राधामोहन सिंह हे याआधीही वादात अडकले आहेत. मध्यप्रदेशातल्या मंदसौर इथे जेव्हा शेतकरी आंदोलन पेटलं होतं, शेतकऱ्यांचे जीव जात होते, तेव्हा ते बाबा रामदेव यांच्यासोबत योगशिबिरात व्यस्त होते. शेतकऱ्यांच्या अवस्थेबद्दल प्रश्न विचारल्यावर, शेतकऱ्यांनी योग करायला पाहिजे असं निर्बुद्ध उत्तरही त्यांनी दिलेलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
करमणूक
राजकारण
क्रीडा
Advertisement