एक्स्प्लोर

समान नागरी कायद्याविरोधात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची सह्यांची मोहीम

मुंबई: मुस्लिम पर्सेनल लॉ बोर्डानं मोदी सरकार आणि न्यायालयाच्या विरोधात देशभर मुस्लिम महिलांच्या सह्याची मोहिम सुरु केली आहे. बोर्डाच्या वतीनं मौलाना मुस्लिम महिलांची भेट घेत आहेत. मोदी सरकार आणि न्यायालयाचीही भूमिका कशी चुकीची आहे, हे सांगणारी ही मोहिम आहे. कोणत्याही परिस्थितीत मुस्लिम पर्सनल लॉ कायद्यात बदल करायला बोर्डाचा विरोध आहे. पण न्यायालयात तलाकवरून निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मुस्लिम महिलांना हवी आहेत. बुधवारपासून ही सह्याची मोहिम देशभर सुरु झाली आहे. मुस्लिम महिलांनीच सर्वोच्च न्यायालयात तलाकच्या प्रथेविरुध्द प्रश्न विचारले आहेत. न्यायालयात मोदी सरकारनं तलाक विरोधी भूमिका घेतली आहे. त्याला या सह्यातून विरोध केला जातो आहे. सर्वोच्च न्यायलायात मुस्लिम महिलांना तलाकविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नांनावर चर्चा करण्याचं टाळून मुस्लिम पर्सेनल लॉ बोर्डांनं देशभर सह्यांची मोहिम सुरु केली. प्रत्येक ठिकाणी मौलाना महिलांची भेट घेत आहे. तलाकच्या निर्णयाला कोणत्याही न्यायालयाच्या, सरकारच्या कक्षेत आणायला विरोध करत आहेत. सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड एक याचिकाकर्ता आहे. न्यायालयात ह्या सह्यांचा उपयोग केला जाऊ शकतो. तलाकची कुराणात सांगितलेली पध्दत वेगळी आहे. आधी तीन वेळेस पती-पत्नीला समजावून सांगायचं. त्यानंतरही जमत नसेल तर तीन वेळेस पतीला तलाक-तलाक-तलाक उच्चारता येते. पण प्रत्येक उच्चाराला प्रत्येकी एक महिना. अशी तीन महिन्याची मुदत आहे. तीन महिन्याची मुदत कोणी पाळत नाही अशीच याचिकाकर्त्यांची तक्रार आहे. मुस्लिम समाज कुराण, हदिस आणि शरियतवर चालतो. कुराणात महंमंद पैंगबरांनी तलाक हे आपल्याला न आवडणारं काम आहे असं सांगितलं आहे. स्वत: पैंगबरांनी आपल्यापेक्षा अधिक वयाच्या स्त्रीशी लग्न करून पुरोगामित्व दाखवलं. याचा आताच्या मौलानांना विसर पडल्याचा आक्षेप कांही महिलांनी न्यायालयात घेतला आहे. मुस्लिम महिलांनीच पुढाकार घेतल्यानं तलाकची चर्चा थांबणार नाही. तलाकचा गैरवापर होतो हे लक्षात घेऊन पाकिस्तानसह २२ मुस्लिम राष्ट्रांनी ट्रिपल तलाकवर ५०च्या दशकात बंदी घातली. उर्वरीत जगातले मुस्लिम त्या-त्या देशाचे कायदे पाळतात. मग इथे समान नागरी कायदा का नको? असे प्रश्न विचारले जातात. तेंव्हा तुमचे शेकडो घटस्फोटाचे अर्ज न्यायालयात प्रलंबित आहेत. तिथे उशीर होतो त्यापेक्षा आमची तलाक पध्दती चांगली असं समर्थन केलं जात. निकाह करताना दोघांची कबूली घेता मग तलाक दोघांच्या संमतीशिवाय का.. हा प्रतिवाद मात्र बिनतोड आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Veteran Actor Anant Nag Receives Dadasaheb Phalke Award: दिग्गज अभिनेते अनंत नाग यांना प्रतिष्ठित 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर, पंतप्रधानांनी ट्वीट करुन दिल्या शुभेच्छा
दिग्गज अभिनेते अनंत नाग यांना प्रतिष्ठित 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर, पंतप्रधानांनी ट्वीट करुन दिल्या शुभेच्छा
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
कारमध्ये दुसरी तरुणी सोबत दिसली अन् बाॅयफ्रेंडला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण EX गर्लफ्रेंडला कारच्या बोनेटवरून 300 मीटर फरफटत नेलं अन्..
कारमध्ये दुसरी तरुणी सोबत दिसली अन् बाॅयफ्रेंडला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण EX गर्लफ्रेंडला कारच्या बोनेटवरून 300 मीटर फरफटत नेलं अन्..
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?

व्हिडीओ

Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report
Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NSE च्या आयपीओसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, 465 कोटींच्या शेअरची खरेदी, अँकर बुकद्वारे NSE च्या तिजोरीत 6746 कोटी जमा
NSE च्या आयपीओसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, 465 कोटींच्या शेअरची खरेदी
UPI MDR :  पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचा यूपीआयवरील शुल्काला विरोध, निर्मला सीतारमण यांना पत्र पाठवलं, थेट इशारा दिला...
UPI वरील शुल्क आकारणीला पेट्रोलपंप चालकांचा विरोध, अर्थमंत्र्यांना पत्र पाठवत इशारा दिला...
Gold Hallmarking Fee : सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरिसहून संपर्कात
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरिसहून संपर्कात
MPSC : एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
Maratha Reservation : पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
Embed widget