Unemployment Rate In India: देशातील बेरोजगारीचा दर एप्रिलमध्ये 7.83 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मार्चमध्ये हा दर 7.60 टक्के होता. सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवणाऱ्या सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संस्थेने एप्रिल महिन्याची आकडेवारी जाहीर केली असून, शहरी भागात बेरोजगारीचा दर 9.22 टक्के होता, तर मार्चमध्ये तो 8.28 टक्के होता.

Continues below advertisement


एप्रिल महिन्यात बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले आहे


देशाच्या ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर एप्रिलमध्ये 7.18 टक्क्यांवर आला आहे. मार्चमध्ये हा दर 7.29 टक्के होता. CMIE च्या मते, हरियाणामध्ये सर्वाधिक 34.5 टक्के बेरोजगारी दर नोंदवला गेला आहे. त्यानंतर राजस्थान 28.8 टक्के बेरोजगारी दरासह दुसऱ्या स्थानावर आहे. बिहार 21.1 टक्क्यांसह तिसर्‍या आणि जम्मू-काश्मीर 15.6 टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे.


श्रमबल भागीदारी आणि रोजगार दरात झाली वाढ 


सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास यांनी पीटीआय-भाषेला सांगितले की, एप्रिलमध्ये कामगार श्रमबल भागीदारी दर आणि रोजगार दरातही वाढ झाली आहे. त्यांनी ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली प्रगती असल्याचे म्हटले आहे. व्यास म्हणाले की, एप्रिल 2022 मध्ये रोजगाराचा दर 37.05 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो महिन्यापूर्वी 36.46 टक्के होता.


महत्वाच्या बातम्या : 



 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha