Tata Coffee : शेअर बाजारात दाखल होणारे नवनवीन आयपीओ आणि कंपन्यांचं विलीनीकरण यामुळे बरेचदा गुंतवणूकदार गोंधळलेले असतात. कुठली गुंतवणूक आपल्यासाठी किती फायदेशीर ठरेल नक्की गुंतवणूक कशात करावी हे कळत नाही. अशातच आता एक आणखी बातमी हाती आली आहे ती म्हणजे, टाटा कॉफीचं टीसीपीएलमध्ये विलीनीकरण होणार आहे. पण या बातमीने तुम्ही गोंधळून जाऊ नका. कारण टाटा कॉफीच्या भागधारकांना टीसीपीएलचे अधिकचे शेअर्स मिळणार आहेत.
टाटा कॉफी लिमिटेडचे टाटा कन्झ्यूमर प्रॉडक्ट लिमिटेडमध्ये (Tata Consumer Products Ltd (TCPL) विलीनीकरण 12-14 महिन्यांत पूर्ण होईल. या दोन्ही कंपन्या नियामक प्रक्रिया दाखल करण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
टाटा कॉफी लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना विलीनीकरणाच्या प्रक्रियेत कोणत्याही अडथळ्यांचा अंदाज नाही. याला सुमारे 12 ते 14 महिने लागतील. त्यामुळे हीच टाइमलाइन आहे. Tata Coffee Ltd ED आणि CFO के वेंकटरामनन यांनी गुंतवणूकदारांच्या बैठकीत विश्लेषकांना याबद्दलची माहिती दिली आहे.
टीपीसीएलने टाटा कॉफीच्या सर्व व्यवसायांचे स्वतःचे किंवा तिच्या सहाय्यक कंपन्यांमध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत टाटा कॉफीच्या शेअरहोल्डर्सना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक 10 इक्विटी शेअर्ससाठी टीपीसीएलचे एकूण 3 इक्विटी शेअर्स मिळणार आहेत.
सध्याच्या भू-राजकीय संकटात मागणीच्या परिस्थितीबद्दल बोलताना व्यवस्थापनाने सांगितले की, रशिया आणि युरोपसाठीही मागणी कायम आहे.टाटा कॉफीला एक निरोगी ऑर्डर बुक मिळाले आहे आणि ग्राहकांनी शिपमेंट चालू ठेवण्यास सांगितल्याची माहिती वेंकटरामन यांनी दिली आहे.
“कॉफी हे एक अतिशय सामान्य आणि मोठ्या प्रमाणावर प्यालेले पेय असल्याने त्याची मागणी आणि पुरवठ्यावर कदापि विशेष परिणाम जाणवणार नाही, हे आमचे मत आहे,” असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने चलनवाढीचा दबाव आणि काही बाजारपेठेतील शिपमेंटसाठी लॉजिस्टिकची चिंता मान्य केली. कंपनी पुढील 3-4 वर्षात मिरपूड व्यवसाय दुप्पट करेल अशी आशा अधिका-यांनी व्यक्त केली आहे.
(Disclaimer - गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घेणे, इथे गुंतवणूक कराच असा सल्ला एबीपी माझा आपल्याला देत नाही.)
संबंधित बातम्या