एक्स्प्लोर

उद्धव ठाकरे शिवनेरीवर, मातीचा कलश अयोध्येला नेणार

शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मातीचा कलश घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत.

पिंपरी चिंचवड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर दाखल झाले. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी गडावर जोरदार तयारी करण्यात आली होती. ढोल-ताशा आणि तुतारीच्या निनादात उद्धव ठाकरेंचं शिवनेरीवर स्वागत झालं. हेलिकॉप्टरने उद्धव ठाकरे शिवनेरीवर आले होते. उद्धव ठाकरे येत्या 24 आणि 25 तारखेला अयोध्येला जाणार आहेत. त्याआधी त्यांनी शिवनेरीचा दौरा हाती घेतला. शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मातीचा कलश घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. 'मी अयोध्येला जाऊन आल्यावर माध्यमांशी बोलेन. निवडणूक समोर आल्याने राम मंदिरचा विषय घेतला, असं बोललं जात आहे. पण मी राजकारण करण्यासाठी जात नाहीये. मी पंचांग पाहून निघालो आहे. अटलजींच्या वेळचं सरकार हे मिला-जुला था, आत्ताचं मजबूत सरकार आहे. हिंदूत गट-तट होऊ नयेत' अशा भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या. 'सर्वांनी एकत्र येऊन राम मंदिर अंतिम टप्प्यात नेलं पाहिजे. शिवनेरीवरची ही केवळ माती नाही, शिवभक्तांच्या भावना आहेत. ही माती तिथं पोहचल्यावर खऱ्या अर्थाने मंदिर बांधण्याला चांलना मिळणार आहे. तिथे सभा घेणार नाही. साधू-संतांचा आशीर्वाद घ्यायला निघालो आहे. शरयू नदीच्या आरतीत सहभागी होणार. 'मंदिर वही बनाएंगे' म्हणत किती दिवस मूर्ख बनवणार आहेत. आणखी किती निवडणुका राम मंदिराचा मुद्दा घेऊन लढणार? टीका करणाऱ्या विरोधकांची किती लायकी आहे, माहित आहे' असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी यावेळी  केला. मुंबईसह राज्यातले अनेक शिवसैनिक अयोध्येच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत. अयोध्येत जिथे हा सोहळा होणार आहे, त्या ठिकाणी शिवसेना नेत्यांनी पूजा केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राजन विचारे, एकनाथ शिंदे आणि विनायक राऊत यासारखे नेते यावेळी उपस्थित होते. वारकऱ्यांच्या एक गटानेही उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला पाठिंबा दिला आहे. अयोध्या दौऱ्यावेळी 25 नोव्हेंबरला महिला आघाडी आणि युवासेनेनं अयोध्येत येऊ नये, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले. महिलांना लक्ष्मणरेषा पाळण्याचं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं. अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी “हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार” असा नवा नारा दिला. अयोध्येत राम मंदिर बांधा, नाही तर हा एक चुनावी जुमला होता, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अयोध्येत जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राम मंदिराबाबत आतापर्यंत जे प्रश्न विचारलेत, तेच प्रश्न आता अयोध्येत जाऊन विचारणार आहे, असं ते म्हणाले होते. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारचा जोरदार समाचार घेतला होता. दुसरीकडे, साधू-संतांची सर्वात मोठी संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेने शिवसेनेचं आमंत्रण केवळ धुडकावलंच नाही तर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर राजकीय खेळी केल्याचा गंभीर आरोपही केला आहे. "आखाड्याशी संबंधित साधू-संत शिवसेनेच्याच नाही तर 25 नोव्हेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमातही सहभागी होणार नाहीत," असं आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Embed widget