एक्स्प्लोर

दाऊदवर UAE सरकारची सर्वात मोठी कारवाई, 15 हजार कोटींची संपत्ती जप्त

नवी दिल्ली : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमविरोधात संयुक्त अरब अमिरात (UAE) सरकारने सर्वात मोठी कारवाई केली आहे. दाऊदची तब्बल 15 हजार कोटींची संपत्ती जप्त केली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी यूएई सरकारला यासंद्रर्भात विनंती केली होती. त्यानंतर युएई सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर दाऊद इब्राहिमच्या कारभाराला मोठा हादरा बसणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएई दौऱ्यादरम्यान भारताकडून दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा तपशील दिला होता, ज्यानंतर यूएई सरकारकडून दाऊदविरोधात पावलं उचलण्यास सुरुवात झाली होती. अखेर 15 हजार कोटींच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करत यूएई सरकारने दाऊदला जबरदस्त दणका दिला आहे. भारताकडून ईडीने जगातील सहा देशांना दाऊदच्या संपत्तीवर कारवाई करण्याबाबत पत्र लिहिलं होतं. या सहा देशांम्ये ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, यूएई, तुर्कस्तान, साइप्रस आणि मोरक्को यांचा समावेश आहे. दाऊद गेल्या 23 वर्षांपासून भारताच्या 'मोस्ट वॉन्टेड' गुन्हेगारांच्या यादीत आहे. त्याच्या काळ्या कमाईचं जाळं जगभरात पसरले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं की, दाऊद इब्राहिमला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. कशाप्रकारे प्रयत्न केले जात आहे, याबाबत कोणतीही माहिती देऊ शकत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
CJP Protest : सीजेपीकडून उद्या देशव्यापी आंदोलनाची घोषणा, विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांना सहभागाचं आवाहन
सीजेपीकडून उद्या देशव्यापी आंदोलनाची घोषणा, विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांना सहभागाचं आवाहन
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
CJP Protest: एका राजीनाम्याने सीजेपीचे आंदोलन थांबू शकते, पण मोदी सरकार धर्मेंद्र प्रधानांच्या पाठीशी का उभे? जाणून घ्या 7 प्रमुख कारणे
एका राजीनाम्याने सीजेपीचे आंदोलन थांबू शकते, पण मोदी सरकार धर्मेंद्र प्रधानांच्या पाठीशी का उभे? जाणून घ्या 7 प्रमुख कारणे

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
CJP Protest: जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
Embed widget