एक्स्प्लोर

ग्रेटर नोएडात दोन इमारती कोसळल्या, तिघांचा मृत्यू

पोलीस आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरु आहे. इमारतींच्या ढिगाऱ्याखालून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : ग्रेटर नोएडामध्ये चार मजली आणि बांधकाम सुरु असलेली सहा मजली इमारत अशा दोन इमारती कोसळल्या. शाहबेरी परिसरात ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून 50 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरु आहे. इमारतींच्या ढिगाऱ्याखालून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दोन इमारतींपैकी एका इमारतीत 10 ते 12 कुटुंब राहत होती. चार मजली इमारत जीर्ण झाली होती, तर दुसऱ्या इमारतीचं बांधकाम सुरु होतं. मंगळवारी रात्री परिसरात मोठा आवाज झाला. परिसरातील घाबरलेल्या लोकांनी भूकंप झाल्याचं समजून घराबाहेर पळ काढला. त्यावेळी दोन इमारती कोसळल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र इमारती कोसळण्याचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच गाझियाबाद पोलीस, नोएडा पोलीस आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं. श्वान पथकाच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्री महेश शर्मा घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्याचा आढावा घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

NEET Re Exam: नीट पुर्नपरीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली
नीट पुर्नपरीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2026 | रविवार
सी-फूड निर्यात कारखान्यात अमोनिया वायूची गळती; अवघ्या पंचविशीतील 7 महिलांचा तडफडून मृत्यू; 65 हून अधिक जखमी, 9 जण व्हेंटिलेटरवर
सी-फूड निर्यात कारखान्यात अमोनिया वायूची गळती; अवघ्या पंचविशीतील 7 महिलांचा तडफडून मृत्यू; 65 हून अधिक जखमी, 9 जण व्हेंटिलेटरवर
Abhijeet Dipke: आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडत आहोत तर अशी वागणूक, आम्ही काय आतंकवादी आहोत का? अभिजित दीपकेंचा संतप्त सवाल
आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडत आहोत तर अशी वागणूक, आम्ही काय आतंकवादी आहोत का? अभिजित दीपकेंचा संतप्त सवाल

व्हिडीओ

Sanjay Dina Patil Daughter : वडिलांनी मातोश्रीची साथ सोडली, मुलगी ठाकरेंसोबतच? | Special Report
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमध्ये किरकोळ कारणावरुन तरुणाला संपवलं; नाशिकमध्येही खळबळ, इमारतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह
बीडमध्ये किरकोळ कारणावरुन तरुणाला संपवलं; नाशिकमध्येही खळबळ, इमारतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह
Omraje Nimbalkar: 'पैशाचा किंवा पदाचा हव्यास नाही, ना मला माझ्या व्यवसायाला संरक्षण घेण्यासाठी मला जायचंय, ना माझ्यावर ईडी, सीबीआयची धाड पडली..' ओमराजेंनी सत्तेतच जाण्यासाठी कोणती कारणे सांगितली?
'पैशाचा किंवा पदाचा हव्यास नाही, ना मला माझ्या व्यवसायाला संरक्षण घेण्यासाठी मला जायचंय, ना माझ्यावर ईडी, सीबीआयची धाड पडली..' ओमराजेंनी सत्तेतच जाण्यासाठी कोणती कारणे सांगितली?
'हे उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो, असं म्हणण्यासारखं, आता राहिलाच कोणता राजीनामा?' मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख सोडण्यावरून खोचक टोला
'हे उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो, असं म्हणण्यासारखं, आता राहिलाच कोणता राजीनामा?' मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख सोडण्यावरून खोचक टोला
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, पिकअप अन् दुचाकीची धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, पिकअप अन् दुचाकीची धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Bhaskar Jadhav: 'भास्करराव जाधव आजकाल..' थेट मिलिंद नार्वेकरांवर चिडलेला तो व्हिडिओ व्हायरल होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खोचक टिप्पणी!
'भास्करराव जाधव आजकाल..' थेट मिलिंद नार्वेकरांवर चिडलेला तो व्हिडिओ व्हायरल होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खोचक टिप्पणी!
NEET Re Exam: नीट पुर्नपरीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली
नीट पुर्नपरीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली
Video: एकनाथ शिंदेंसाहेबांच्या नेतृत्वात काम करणार, ओमराजेंची घोषणा; निकालानंतर मुख्यमंत्र्यांचा फोन, ठाकरेंबद्दलही बोलले

Embed widget