मुंबई : गाडीमध्ये पेट्रोल भरताना राऊंड फिगर अर्थात 100, 200, 300 अशा रुपयात पेट्रोल भरु नये, असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या मेसेजमध्ये कितपत तथ्य आहे, याची पडताळणी -


 

तुम्ही कधी पेट्रोल पंपवर गाडी घेऊन गेल्यास नेहमी 50,100, 200 अशा राऊंड फिगर रकमेत पेट्रोल भरत असाल. कधीही कोणी 55, 110, 125 अशा रकमेचं पेट्रोल भरत नाही. त्यामुळे अशाच आशयाचा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे.

 

व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटलंय?

आवश्यक सूचना

कृपया अपनी गाड़ी में पेट्रोल कभी भी राउंड फिगर में ना भरवाएं. 50, 100, 150, 200 रुपए इस रकम पर पेट्रोल ना भरवाएं क्योंकि इन अंकों पर कोड सेट किए हुए होते हैं. जिससे आपकी गाड़ी में भरने वाला ईंधन 15 से 20 फीसदी कम आता है और आपका काफी नुकसान होता है. आगे से अपनी गाड़ी में 55, 60, 110, 115, 155, 160, 170, 205, 210, 220 इन अंको मतलब इतने पैसे का पेट्रोल भरवाएं और अपनी गाड़ी में पूरा पेट्रोल पाएं. आखिर में लिखा है इस मैसेजों के हर किसी तक पहुंचाए ताकि अपना पैसा किसी चोर की जेब में ना जाने पाए. भारत सरकार द्वारा जनहित में जारी.

 

एबीपीकडून पडताळणी

 

या मेसेजची सत्यता पडताळण्यासाठी एबीपीच्या प्रतिनिधीने थेट पेट्रोल पंप गाठला. तिथे गाडीत पेट्रोल भरण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची पडताळणी केली. पेट्रोल पंपावरील मशीनमध्ये अशी छेडछाड करणं अशक्य असल्याचं, या पडताळणीत समोर आलं.

 

या मशिन्समध्ये असे सॉफ्टवेअर असतात, ज्यांच्यावर आयओसीएल अर्थात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम यासारख्या कंपन्यांचं नियंत्रण असतं.

 

इतकंच नाही तर कोणत्या नोझलमधून किती पेट्रोल भरलं जात आहे, याचाही संपूर्ण डेटा पेट्रोल पंपापासून कंपनीपर्यंत सर्वांकडे असतो. कोणत्याही प्रकारची अफरा-तफर झाल्यास ते सहज सापडू शकतं.

 

त्यामुळे एबीपीच्या पडताळणीत व्हायरल होणारा हा मेसेज खोटा असल्याचं सिद्ध होतं.