वाशिंग्टन: प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी घटना अमेरिकन संसदेत घडली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान आख्ख्या संसदेने आठ वेळा उभं राहून त्यांना अभिवादन केलं. तसंच अमेरिकन सिनेटर्सनी तब्बल 66 वेळा टाळ्यांच्या गजरात मोदींना दाद दिली.


 

अमेरिकन संसदेचे अध्यक्ष पॉल रायन यांनी नरेंद्र मोदींना 8 जून रोजी अमेरिकन सिनेटर्सना संबोधित करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. 2005 रोजी याच अमेरिकेच्या संसदेने एक प्रस्ताव मंजूर करुन मोदींना अमेरिकेचा व्हिजा नाकारला होता. त्यामुळे अमेरिकन संसदेने मोदींना दिलेलं आमंत्रण एका अर्थाने महत्त्वाचं होतं.

 

 

मोदींनीही अमेरिकन संसद चांगलीच गाजवली. मोदींचं भाषण सुरु असताना तब्बल 66 वेळा सर्व अमेरिकन सिनेटर्सनी त्यांना प्रतिसाद दिला. तर भाषण संपल्यानंतर सर्व सिनेटरनी उभारुन त्यांना अभिवादन केलं.

 

पाहा संपूर्ण भाषण