एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बेळगावात नॅशनल हायवेवर ‘द बर्निंग ट्रक’चा थरार
अग्निशामक दलाने वेळीच पोहोचून पेटलेला ट्रक विझवला. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
बेळगाव : पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकने अचानक पेट घेतल्यामुळे महामार्गावर गोंधळ उडाला. भुतरामहट्टी येथे ही घटना घडली. अग्निशामक दलाने वेळीच पोहोचून पेटलेला ट्रक विझवला. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
कोल्हापूरहून बंगलोरकडे मालवाहू ट्रक जेसीबी घेऊन निघाला होता. भुतरामहट्टी येथे ट्रक आल्यावर इंजिनमधून धूर येत असल्याचे चालकाच्या ध्यानात आले. लगेच चालक आणि क्लिनर ट्रकमधून खाली उतरले. इंजिनमधून धूर आल्यावर काही वेळाने आग लागली. इंजिनला लागलेली आग पसरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळातच अग्निशामक दल दाखल झाले आणि त्यांनी त्वरित आग विझवली.
ट्रकला आग लागल्याची घटना कळताच काकती पोलीस लगेच दाखल झाले आणि त्यांनी वाहतुकीवर नियंत्रण ठेवले. महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाल्यामुळे एका बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement