नवी दिल्ली :  संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाक प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल सुनावला. तिहेरी तलाकवर आजपासून बंदी घालून, सरकारने सहा महिन्यात कायदा करावा, असा सल्ला कोर्टाने दिला आहे.


या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

मोदी म्हणाले, “सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल ऐतिहासिक आहे. या निर्णयामुळे मुस्लिम महिलांना समानतेचा हक्क मिळेल, तसंच महिला सबलीकरणासाठी हा निर्णय मापदंड ठरेल”

https://twitter.com/narendramodi/status/899907807322841088

अमित शाह यांच्याकडूनही स्वागत

तिहेरी तलाक रद्द झाल्यानं आता मुस्लिम महिलांसाठी नव्या युगाला सुरूवात झाली आहे, अशी प्रतिक्रिया भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दिली.

“मुस्लिम महिलांसाठी स्वाभिमानपूर्ण आणि समानतेच्या नव्या युगाची सुरुवात म्हणून सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाकडे पाहिलं जाईल. हा निर्णय जय-पराजयाचा नाही. हा मुस्लिम महिलांच्या समानतेचा अधिकार आणि मूलभूत संविधानाने दिलेल्या अधिकाराचा विजय आहे” असं अमित शाह म्हणाले.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल सुनावला. कोर्टाने तिहेरी तलाकचा चेंडू केंद्र सरकारकडे टोलवत, सहा महिन्यात कायदा करण्याचा आदेश संसदेला दिला आहे. कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकला बंदी घालण्यात आली आहे.

म्हणजेच आजपासून संसदेत कायदा तयार होईपर्यंत तिहेरी तलाकवर बंदी असेल. मात्र कायदा होण्यास विलंब लागला तरीही तिहेरी तलाकवरील बंदी कायम असेल.

सरन्यायाधीशांसह 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने आज आपला निर्णय दिला. मात्र तिहेरी तलाकवरुन 5 पैकी 3 न्यायाधीश हे तिहेरी तलाकविरोधात तर 2 न्यायाधीश हे तलाकच्या बाजूने होते.

संबंधित बातम्या

तिहेरी तलाकविरोधात तातडीने कायदा करु: मेनका गांधी 

तिहेरी तलाकवर आजपासून बंदी: सुप्रीम कोर्ट

Triple Talaq : 5 पाईंटमध्ये समजून घ्या सुप्रीम कोर्टाचा निकाल

तिहेरी तलाक : मुस्लीम महिलांचा आवाज…शायरा बानो

Triple Talaq : 3 विरुद्ध 2 ने तलाकवर मात, कोर्ट रुम 1 मध्ये नेमकं काय घडलं?