एक्स्प्लोर

तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक आज राज्यसभेत मांडणार

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत 245 विरुद्ध 11 अशा फरकाने मंजूर झालं. विधेयकावरील चर्चेदरम्यान विविध पक्षांच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली.

नवी दिल्ली : तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. यासाठी भाजपने सर्व खासदारांना व्हीप देखील जारी केला आहे. याआधी राज्यसभेत विरोधकांनी या विधेयकाला विरोध केला होता.

लोकसभेतही तिहेरी तलाक विधेयकाला विरोध करताना हे विधेयक संयुक्त संसदीय निवड समितीकडे पाठवावं अशी मागणी काँग्रेसने केली होती. बहुमताच्या जोरावर भाजपने हे विधेयक लोकसभेत मंजूर करुन घेतलं. मात्र राज्यसभेत भाजपचं संख्याबळ तुलनेत कमी असल्यानं तिहेरी तलाक विधेयक मंजूर करुन घेण्यसाठी भाजपला कसरत करावी लागणार आहे.

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत 245 विरुद्ध 11 अशा फरकाने मंजूर झालं. विधेयकावरील चर्चेदरम्यान विविध पक्षांच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली. हे विधेयक कुठलाही धर्म किंवा समाजाविरोधात नाही तर महिलांचे हक्क आणि त्यांच्या सन्मानासाठी असल्याचं केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं होतं. सती, बालविवाहासारख्या परंपरांचा नायनाट करतानाही अशा विरोधाला सामोरं जावं लागलं होतं, असं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले होते.

देशात समान नागरी कायदा लागू केला तर तिहेरी तलाकच्या कायद्याची गरज पडणार नाही, अशी भूमिका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी घेतली होती. तिहेरी तलाक हा विषय मोठा असून, संयुक्त संसदीय समितीमार्फत यावर अभ्यास व्हावा, अशी भूमिका काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मांडली होती.

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विधेयकाला विरोध करत मुस्लिम संस्कृती आणि मान्यतेचं उल्लंघन असल्याचं म्हटलं होतं. तर वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या विधेयकाबाबत आपलं परखड मत व्यक्त केलं होतं.

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत दुसऱ्यांदा सादर झालं होतं. मागच्या वेळी राज्यसभेत हे विधेयक पास होऊ न शकल्यामुळे तो अध्यादेश रद्दबातल ठरला होता. तिहेरी तलाक विधेयकात तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

तिहेरी तलाक विधेयकातील सुधारणा

तिहेरी तलाकसंदर्भातील नवे विधेयक लोकसभेत 17 डिसेंबर रोजी मांडण्यात आले. या सुधारित विधेयकामध्ये काही बदल सरकारने केले आहेत. नव्या बदलानुसार, केवळ पीडित आणि तिचे जवळचे नातेवाईकच याप्रकरणी गुन्हा दाखल करू शकणार आहे, त्रयस्थ व्यक्ती नाही.

जर प्रकरण सामोपचाराने मिटत असेल तर केस मागे घेण्याचा अधिकार महिलेला असणार आहे. महिलेने तिची बाजू सांगितल्यानंतर पतीला जामीन द्यायचा की नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
Embed widget