ममतांच्या कॅबिनेटमध्ये 17 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत 294 पैकी 211 जागांवर विजय मिळाला.
ममतांच्या शपथविधी सोहळ्याला भुतानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, लालूप्रसाद यादव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि अभिनेता शाहरूख खान यांची विशेष उपस्थिती असेल.
ममतांच्या या शपथविधी सोहळ्यावर मात्र पश्चिम बंगालमधील भाजप आणि काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत हा बहिष्कार टाकण्यात येत आहे.