Trending News : आईने केलेल्या एका छोट्या चुकीमुळे मुलाचे तब्बल तीन हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या मुलाने आपली ओळख गुप्त ठेवून या घटनेबाबत माहिती दिली आहे. सोशल मीडियाच्या 'रेडिट' या साइटवर आपले नाव गुप्त ठेवून पीडित तरूणाने घटनेचा संपूर्ण घटनाक्रमच सांगितला आहे. 


याबाबत माहिती देताना तरूणाने सांगितले की, "माझ्या आईमुळे माझे संपूर्ण आयुष्याचे नुकसान झाले आहे. 'द सन'च्या अहवालानुसार या तरूणाने 2010 मध्ये 6 हजार रूपयांचे दहा हजार बिटकॉइन (Bitcoin) खरेदी केले होते. या बिटकॉइनची आजची किंमत तीन हजार कोटी रूपये आहे. हा तरूण 2010 ला कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. त्यानंतर तो एका ठिकाणी नौकरी करण्यासाठी गेला. त्यावेळी तो बिटकॉइन (Bitcoin) खरेदीबद्दल विसरून गेला. 


आईच्या उत्तराने मुलगा हैराण
गेल्या काही वर्षांपासून क्रिप्टोकरंसीच्या (Cryptocurrency) मार्केटबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर त्या तरूणाला आपण बिटकॉइन खरेदी केल्याची आठवण झाली. आठवण होताच तो तत्काळ घरी पोहोचला आणि आपले लॅपटॉप शोधू लागला. खूप शोधूनही लॅपटॉप मिळाला नसल्याने त्याने आईला विचारले. आईने दिलेले उत्तर एकून त्याची झोपच उडाली. त्याच्या आईने सांगितले की, "मी तो लॅपटॉप रद्दीत फेकून दिला आहे." 


तरूण गेला होता नैराश्यात
आजच्या तारखेला त्या बिटकॉइनची किंमत तब्बल तीन हजार कोटी रूपये आहे. तरूणाने सांगितले की, या सर्व प्रकरणानंतर मी नैराश्यात गेलो होतो. आता मी त्यातून बाहेर आलो आहे. मला खेद वाटत आहे की, माझ्या हातून एवढी मोठी रक्कम गेली आहे. बिटकॉइन हे एक डिजिटल चलन आहे आहे. 2009 मध्ये याची सुरूवात झाली होती.   


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्वाच्या बातम्या