एक्स्प्लोर

डेबिट कार्ड व्यवहारावरील शुल्काची कमाल मर्यादा 200 रुपये?

डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) सूचना दिल्या आहेत.

मुंबई : डेबिट कार्डवरुन करण्यात येणाऱ्या व्यवहारांवरील शुल्काची कमाल मर्यादा 200 रुपये होण्याची शक्यता आहे. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. या सूचनांमध्ये डेबिट कार्डवरील व्यवहारांवर आकारण्यात येणाऱ्या शुल्काचाही उल्लेख आहे. डेबिट कार्डवरील मर्चंट डिस्काऊंट रेट (MDR) म्हणजेच व्यवहारावरील शुल्काची कमाल मर्यादा निश्चित केली जावी, अशी सूचना माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आरबीआयला केली असून, ही कमाल मर्यादा 200 रुपये असण्याची शक्यता आहे. जर कमाल मर्यादा 200 रुपये निश्चित करण्यात आली, तर डेबिट कार्डच्या माध्यमातून मोठ्या रकमेचा व्यवहारही ग्राहक निश्चिंतपणे करु शकतील आणि यामुळे डिजिटल व्यवहारांनाही चालना मिळेल. त्याचसोबत, मोठ-मोठ्या व्यवहारांवर नजर ठेवण्यासही सरकारला सोपं जाईल. सध्या किती शुल्क आकारलं जातं? आजच्या घडीला डेबिट कार्डवरुन 1 हजार रुपयांपर्यंत व्यवहार केल्यास जास्तीत जास्त 0.25 टक्के म्हणजेच अडीच रुपये, तर 1 हजार ते 2 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारावर 0.5 टक्के शुल्क म्हणजे 10 रुपये आकारले जातात. 2 हजार रुपयांहून अधिकच्या व्यवहारावर 1 टक्के शुल्क आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर 16 डिसेंबरला आरबीआयने डेबिट कार्डवरुन व्यवहार करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्क रचनेत बदल करण्याची घोषणा केली होती. शिवाय, जानेवारी ते मार्चपर्यंत नवे शुल्क लागू करण्याचेही सांगिण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही आधीचीच शुल्क रचना चालू ठेवण्यात आली होती. आरबीआयने फेब्रुवारीमध्येच डेबिट कार्डवरील व्यवहारांवर नव्या शुल्कांचा मसुदा प्रसिद्ध करत लोकांकडून त्यावर सूचना मागवल्या होत्या. आतापर्यंत आलेल्या सूचनांवर आरबीआयकडून विचारमंथन सुरु होतं. डेबिट कार्डवरील प्रस्तावित शुल्क रचना :
  • दरवर्षी 20 लाख रुपयांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी स्वाईप मशिनवरील व्यवाहारांसाठी सर्व्हिस चार्ज म्हणजे एमडीआर जास्तीत जास्त 0.4 टक्के असेल.
  • व्यापाऱ्यांना 1 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारावर 4 रुपये शुल्क, 1 हजार ते 2 हजारापर्यंतच्या व्यवहारांवर 8 रुपये असेल. याचप्रकारे एक हजाराहून कमी रकमेवरील शुल्क वाढवण्यात येणार आहे.
  • जर कुठल्या दुकानात स्वाईप मशिनऐवजी क्यूआर कोडद्वारे व्यवहार केला जात असेल, तर जास्तीत जास्त 0.3 टक्के शुल्क आकारला जाईल. म्हणजेच 1000 रुपयांवर 3 रुपये.
  • डेबिट कार्ड व्यवहारांवरील नवे शुल्क वीज, पाणी यांच्या पेमेंटसाठी किंवा आर्मी कँटिन आणि विमा पॉलिसीच्या पेमेंटसाठीही लागू असतील.
  • 20 लाख रुपयांहून अधिकचा व्यापार करणाऱ्यांना व्यवहारावर 0.95 एमडीआर असेल. म्हणजेच एक हजार रुपयांवद जास्तीत जास्त 9 रुपये आकारले जातील.
  • पासपोर्टसाठी शुल्क, टॅक्स, स्टॅम्प ड्युटी, रोड टॅक्स किंवा हाऊस टॅक्स इत्यादींच्या पेमेंटसाठी ज्यावेळी डेबिट कार्डचा वापर केला जाईल, त्यावेळी आकारण्यात येणाऱ्या शुल्कासाठी वेगळी रचना असेल. 1 हजार रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर 5 रुपये, 1 हजार ते 2 हजारांपर्यंत 10 रुपये आणि 2 हजार रुपयांहून अधिकच्या व्यवहारांसाठी जास्तीत जास्त 250 रुपये शुल्क आकारले जातील.
  • व्यवहारांवर शुल्क आकारल्यानंतर कुठल्याही प्रकारची कन्व्हिनियन्स फी किंवा अतिरिक्त शुल्क आकरणार नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, याबाबत आरबीआयने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. लोकांकडून मागवलेल्या सूचनांवर विचार करुन अंतिम निर्णय घेतला जाईल आणि नवी शुल्क रचना लागू केली जाईल. मात्र, डेबिटा कार्डवरील शुल्काची कमाल मर्यादा 200 रुपये ठरवण्यात आल्यास मोठ्या रकमेचा व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना नक्कीच दिलासा देणारा निर्णय ठरेल, यात शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या

'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका

Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक

व्हिडीओ

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
West Zone Squad for Duleep Trophy : ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
Dhananjay Munde: आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
Embed widget