'वंदे भारत एक्स्प्रेस' पहिल्याच प्रवासात खोळंबली, शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी ट्रेनला दाखवलेला हिरवा झेंडा
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या ट्रेनला हिरंवा झेंडा दाखवण्यात आला होता. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये अवघ्या 18 महिन्यात या ट्रेनची निर्मिती करण्यात आली होती. 'ट्रेन 18' नाव असलेल्या ट्रेनचं 'वंदे भारत एक्स्प्रेस' हे नामकरण करण्यात आलं होतं.

नवी दिल्ली : भारताची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन 'वंदे भारत एक्स्प्रेस' पहिल्याच प्रवासातच थाबंवण्यात आली. आज सकाळी म्हशीने धडक दिल्याने ट्रेन काही वेळ थाबंवण्यात आली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ट्रेन वाराणसीहून दिल्लीला परतत असताना हा प्रकार घडला. उत्तरप्रदेशच्या टुंडला स्टेशनपासून 18 किमीवर ही ट्रेन थांबवण्यात आली. सकाळी 5.30 वाजता ट्रेन थांबली होती, त्यानंतर जवळपास 8.15 वाजता ही ट्रेन पुन्हा दिल्लीला रवाना झाली.
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या ट्रेनला हिरंवा झेंडा दाखवण्यात आला होता. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये अवघ्या 18 महिन्यात या ट्रेनची निर्मिती करण्यात आली होती. 'ट्रेन 18' नाव असलेल्या ट्रेनचं 'वंदे भारत एक्स्प्रेस' हे नामकरण करण्यात आलं होतं.
'वंदे भारत एक्स्प्रेस'ची वैशिष्ट्ये
ही ट्रेन प्रतितास 160-200 किमी/तास वेगाने ही ट्रेन धावू शकते. या ट्रेनमध्ये शताब्दी ट्रेनसारख्या अत्याधुनिक सुविधा आहे. या ट्रेनचं तिकीट बुकिंगही सुरु झालं आहे. 17 फेब्रुवारीपासून दिल्ली ते वाराणसी या मार्गावर आठवड्यातून पाच दिवस ही ट्रेन चालवण्यात येणार आहे.
या ट्रेनला 16 वातानुकूलित डबे असणार आहेत, ज्यामध्ये दोन डबे एक्झिक्युटिव्ह श्रेणीचे असणार आहेत. या ट्रेनमध्ये एकूण 1,128 प्रवासी बसण्याच क्षमता आहे. ट्रेनचे दरवाचे स्वयंचलित आहेत. प्रवाशांच्या ट्रेनमध्ये हॉटस्पॉटची सुविधाही देण्यात आली आहे. जीपीएस प्रणालीद्वारे प्रत्येक प्रवाशाची माहिती रेल्वेला मिळू शकेल.
डब्यांमध्ये दोन प्रकारची प्रकाश सुविधा देण्यात आली आहे, एक सर्वांसाठी सामान्य प्रकाश सुविधा आणि दुसरी प्रत्येक सीटवर वेगवेगळी प्रकाश व्यवस्था देण्यात आली आहे. रेल्वेत झिरो डिस्सार्ज बायो व्हॅक्युम शौचालये आहेत.
Before You Go
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत





















