मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..



मंत्रिमंडळ कॅबीनेट बैठक, मास्क आणि पेट्रोल दराविषयी बैठकीत चर्चा


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यावर टीका केल्यांनातर पेट्रोल डिझेलच्या दराबाबत सरकार दर कमी करण्याचा विचार करत आहे. पेट्रोलचे दर कमी करता येईल का यासंदर्भांत आजच्या कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. डिझेलचे दर 1 रुपयांनी कमी करता येतील का हे ही तपासलं जाणर अशी माहित सूत्रांनी दिली आहे. पेट्रोल- डिझेलवरील कर, कराची केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या तिजोरीत किती रक्कम? कर रचनेतील बदलाची सविस्तर माहिती दिलेली आहे.  
मंत्रीमंडळ बैठकीत मास्क वापरासंदर्भात काही निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधानांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांच्या सोबतच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क घालणं गरजेच आहे अशा प्रकारची मागणी केली. आज विषय चर्चेला येऊ शकतो.  


मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक


राज्य सरकारने खासदार संभाजीराजे छत्रपती यांना दिलेल्या आश्वासनांचा पाठपुरावा करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचं मंत्रालयात ठिय्या आंदोलन केले  मराठा समाजाचे प्रश्न अद्याप न सुटल्याने मराठा तरुण आणि मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचे पाच जणांचे शिष्टमंडळ अजित पवारांसोबच्या बैठकीला हजर असणार आहे.  28 फेब्रुवारी रोजी मान्य केलेल्या मागण्यांसंदर्भात मराठा समन्वयकांचे प्रश्न बैठकीत मांडले जाणार
सात महत्त्वाच्या मागण्यांबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे मराठा समाजात नाराजी  आहे. 


 नवनीत राणांविरोधात गुन्हा नोंद करण्यासंदर्भात पोलिसांकडून आढावा बैठका 
 
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप केले.  राऊतांच्या आरोपानंतर आर्थिक गुन्हे शाखा नवनीत राणा यांची चौकशी करण्याची शक्यता आहे.  अंडरवर्ल्ड प्रकरणी खार पोलीस ठाण्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे. युसूफ लकडावालाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्याचा जबाब होणार नाही आणि न्यायालयात केस टिकणार नाही.  त्यामुळे नवनीत राणा विरोधात गुन्हा कसा नोंद करायचा यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून बैठकांना सुरुवात झाली आहे. 


राष्ट्रवादी आणि भाजपत मंत्रीपदं वाटपाचंही  ठरलेलं, आशिष शेलारांचा गौप्यस्फोट


शिवसेनेचे नेते रोज खिशात राजीनामे आणि तोंडात जहर अशी त्रास देण्याची भूमिका  होती. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी आणि भाजपा असं सरकार करावं, अशी चर्चा झाली. पालकमंत्री देखील ठरले. त्यानंतर पुन्हा भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वानं ठरवलं की आपण तीन पक्षांचं सरकार करू. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी असं सरकार करू. पण तेव्हा राष्ट्रवादीनं याला नकार दिला.  आमचं शिवसेनेशी जमूच शकत नाही. राष्ट्रवादी भाजपासोबत येत असताना भाजपानं शिवसेनेला सोडायला नकार दिला. लोकसत्ताच्या दृष्टी आणि कोन या कार्यक्रमात आशीष शेलार यांनी यांनी हा गौप्यस्फोट केला.  


 गणेश नाईक डीएनए टेस्टसाठी तयार, भवितव्याचा निर्णय आज होणार 


 ठाणे सत्र न्यायालयाने बुधवारी देखील जामीन न देता निकाल राखून ठेवला. मात्र गणेश नाईक हे डी एन ए टेस्ट करण्यासाठी तयार असल्याचे सांगून वकिलांनी मोठा धक्का दिला. या संदर्भात आजच्या सुनावणीला मोठे महत्त्व आहे. नेरूळ आणि बेलापूर पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यात गणेश नाईक यांची कस्टडी मागितल्याने गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


DC vs KKR : आज रंगणार दिल्ली विरुद्ध कोलकाता लढत


DC vs KKR : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) संघ मैदानात उतरणार असून त्यांच्यासमोर कोलकाता नाईट रायडर्स संघाचं आव्हान असेल. दोन्ही संघ गुणतालिकेत खास स्थानी नसले तरी त्यांची यंदाच्या हंगामातील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी काही सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला असून काही सामने अगदी थोडक्यात त्यांच्या हातातून सुटले आहेत. यामुळे आजच्या त्यांच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष्य लागून राहिले आहे. यंदाच्या गुणतालिकेचा विचार करता दिल्ली कॅपिटल्सने 7 पैकी 3 सामने जिंकत 6 गुणांसह सातवं स्थान मिळवलं आहे. तर आठव्या स्थानावर असणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने 8 पैकी 3 सामने जिंकत सहाच गुण मिळवले आहेत. आज होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) या सामन्यात दोन्ही संघाकडून दमदार खेळाडूंची फौज मैदानात उतरणार यात शंका नाही. दोन्ही संघाकडून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाणार.


आज इतिहासात


1740 - पहिले बाजीराव पेशवे यांचे निधन


2008 -  भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने ‘पीएसएलव्ही-सी 9’ या उपग्रहाचे प्रक्षेपण करून नवीन इतिहास रचला


1998  - माजी भारतीय क्रिकेटपटू व वेगवान गोलंदाज, तसचं, राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष रमाकांत देसाई यांचे निधन.