Taj Mahal Controversy :  योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात सद्गुरू परमहंसाचार्य  यांना ताजमहालमध्ये (Taj Mahal) प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्यानं नवा वाद निर्माण झाला. अयोध्येतून (Ayodhya) आग्रा (Agra) येथे ताजमहाल पाहण्यासाठी गेल्यानंतर भगवे कपडे घातल्यानं आपल्याला रोखण्यात आल्याचा दावा सद्गुरू परमहंसाचार्य यांनी केला. तिकिट दुसऱ्यांना विकून पैसे परत केल्याचंही परमहंसाचार्य यांनी म्हटलंय. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वर्तनावर त्यांनी आक्षेप घेतला. पण परमहंसाचार्य यांनी केलेले हे आरोप पुरातत्व अधिकाऱ्यांनी फेटाळले. सद्गुरु परमहंसाचार्य यांना भगवे कपडे घातल्यानं नव्हे तर धर्मदंड असल्यानं रोखण्यात आलं, असं स्पष्टीकरण पुरातत्व विभागाच्या अधीक्षकांनी दिलाय. या सगळ्या घटनाक्रमानंतर पुरातत्व विभागाचे अधीक्षक आर. के. पटेल यांनी परमहंसाचार्यांची माफी मागितली आहे. 


सद्गुरू परमहंसाचार्य  यांनी याप्रकरणी कारवाईची मागणी  केली आहे. या प्रकरणाची  दखल घेतली जावी, असं त्यांनी सांगितलं. 'भगव्याला आक्षेप का? भगव्याला आणि धर्मदंडावर आक्षेप असेल तर त्याची दखल घेतली पाहिजे. सनातन संस्कृती आणि भगव्याची ज्या प्रकारे खिल्ली उडवली गेली, ती गोष्ट चांगली नव्हती. सामान्य लोकांनाही ते पाहून वाईट वाटले', असंही  सद्गुरू परमहंसाचार्य यांनी सांगितलं.  


काय म्हणाले अधिकारी?
पुरातत्व विभागाचे अधीक्षक आर. के. पटेल यांनी सांगितलं की, सकाळी11:30  वाजता या घटनेबाबत मला माहिती मिळाली. एका स्थानिक पत्रकारानं मला ही माहिती दिली.  त्यानंतर मी कर्मचाऱ्यांसोबत संपर्क साधला. पण त्यांनी मला सांगितलं की, अशी कोणतीच घटना घडलेली नाही. त्यानंतर मला कळाले की तिथे काही सुरक्षा कर्मचारी होते.  एएसआयच्या अधिकाऱ्यांना याबाबत कोणतीही माहिती नव्हती. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: