एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'स्टॅच्यू ऑफ युनिटी' आजपासून सर्वसामान्यांसाठी खुलं
सरदार पटेलांच्या पुतळ्याजवळ काल पहिल्यादांच लेजर शोच आयोजन करण्यात आलं होतं. भव्य पुतळ्यासोबत सरदार पटेलांच म्युझियम, ऑडियो व्हिज्युअल गॅलरी, फूलांची बागं आणि सरदार सरोवर हे सर्व आज खुलं करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर, आज सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं आहे. सरदार पटेल यांचे हे शिल्प जगातील सर्वात उंच शिल्प आहे.या पुतळ्याची उंची १८२ मीटर आहे.
सरदार पटेलांच्या पुतळ्याजवळ काल पहिल्यादांच लेजर शोच आयोजन करण्यात आलं होतं. भव्य पुतळ्यासोबत सरदार पटेलांच म्युझियम, ऑडियो व्हिज्युअल गॅलरी, फूलांची बागं आणि सरदार सरोवर हे सर्व आज खुलं करण्यात आलं आहे.
कोणत्या वेळी पाहू शकतात?
'स्टॅच्यू ऑफ यूनिटी' लोकांसाठी दररोज सकाळी 9 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत खुलं असेल. येथे जाण्यासाठी ऑनलाइन बुकींग ही करु शकतात. त्यासाठी https://www.soutickets.in या वेबसाईटवर टिकीट बुक करु शकतात. जगातील सर्वात उंच पुतळ्यात अनावरण होताच, पहिल्या दोन दिवसांच्या सर्व तिकीटांची विक्री झाली आहे.
तिकीटदर काय असेल?
15 वर्षाखालील मुलांसाठी 60 रुपये तर प्रौढांसाठी 120 रुपये तिकीट आकारला जाणार आहे. तर स्टॅच्यूच्या दोन्ही बाजु पाहण्यासाठी 350 रुपये तिकीट असेल. तर बसने स्टॅच्यूपर्यंत पोहचण्यासाठी 30 रुपये तिकीट असणार आहे.
33 महिन्याच्या कालावधीत पुर्ण झाला स्टॅच्यू ऑफ यूनिटी
जगातील सर्वात उंच असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचं काम 33 महिन्यात पुर्ण झाला आहे. जमीनीपासून 182 मिटर उंचीचा असलेली सरदार पटेलांचा पुतळा चीनमधील स्प्रिंग मंदिरातील बुद्धाची मूर्ति आणि अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा उंच आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement