On This Day In History :  आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 8 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं. त्याशिवाय भौतिकशास्त्र आणि कॉस्मोलॉजी (विश्वनिर्मिती) या क्षेत्रात भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता. राजस्थान विद्यापीठाची स्थापना 8 जानेवारी रोजी झाली होती. याशिवाय आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.


1642 : गॅलिलिओ गॅलिली यांचं निधन (Galileo Galilei)
महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं. अवकाशातील शोध घेण्यासाठी त्यांनी आधुनिक दुर्बीन बनवली होती. अवकशाचे न उलगडलेलं रहस्य त्यांच्या दुर्बीनीमुळे उलगडायला मदत झाली. रूढीवादी विचारांचा पगडा असलेल्या काळात गॅलिलिओ ने सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं सांगितल्याचं म्हटलं जातेय.  गॅलिलियो गॅलिली यांना ‘आधुनिक खगोल विज्ञानाचे जनक’ आणि ‘आधुनिक भौतिकशास्त्राचे जनक’ असेही म्हटलं जाते


1901 :  आशापूर्णा देवी यांचा जन्म  (Ashapurna Devi)


प्रसिद्ध बंगाली लेखिका आणि कादंबरीकार आशापूर्णादेवी यांचा जन्म 8 जानेवारी 1909 रोजी झाली होता. त्यांच्या अनेक कादंबरी प्रसिद्ध आहेत. परंपरेच्या जोखडात बांधलेल्या स्त्रीच्या स्थितीचं, तिच्या प्रश्नाचं एकूणच समस्त बंगाली भावजीवनाचं दर्शन, अत्यंत सहज, सरळ पण प्रभावी शैलीत आपल्या साहित्यातूनत्यांनी घडवलं आहे. त्यांना  ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलेय.   


 1929 : सईद जाफरी यांचा जन्म (Saeed Jaffrey) -
भारतीय आणि ब्रिटिश चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे  अभिनेते सईद जाफरी यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता. त्यांनी केलेल्या अनेक भूमिका अजरामर झाल्या आहेत.  शतरंज के खिलाडी (1977), गांधी (1982), राम तेरी गंगा मैली (1985), दिल (1990), अजूबा (1990) हिना (1991) या सिनेमांतील त्यांच्या भूमिकांनी विशेष छाप सोडली होती. 15 नोव्हेंबर 2015 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 


1942 - स्टिफन हॉकिंग Stephen Hawking  


8 जानेवारी 1942 रोजी स्टिफन हॉकिंग यांचा जन्म झाला होता. भौतिकशास्त्र आणि कॉस्मोलॉजी (विश्वनिर्मिती) या क्षेत्रात भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग यांचं भरीव योगदान आहे. बिग बँग थिअरी, कृष्णविवरावरील हॉकिंग यांचं संशोधन भौतिकशास्त्रासाठी मोठं योगदान आहे. विपुल वैज्ञानिक पुस्तकांचं लेखन हॉकिंग यांनी केलं होतं. आईन्स्टाईननंतरचे मोठे शास्त्रज्ञ अशी त्यांची ख्याती आहे. 'ज्या माणसांवर तुम्ही मनापासून प्रेम करता, तेच जर जगात नसतील, तर हे जग काय कामाचं.' हे हॉकिंग यांचं वाक्य प्रसिद्ध आहे. हॉकिंग यांचा जन्म 8 जानेवारी 1942 मध्ये इंग्लंडमधील ऑक्सफर्डशायरमध्ये झाला. ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतलं. 2018 साली त्यांचं  वयाच्या 76 व्या वर्षी निधन झालं.


1947 : राजस्थान विद्यापीठाची स्थापना (University of Rajasthan)


आजच्याच दिवशी 1947 मध्ये राजस्थान (राजपूताना) विद्यापीठाची स्थापना झाली होती. भारतामधील आघाडीच्या विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं. हे विद्यापीठ 300 एकरवर आहे.  1956 मध्ये विद्यापीठाचं नामांतर झालं. देश विदेशातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. डॉ. मोहन सिंह मेहता याचे संस्थापक होते.  हे विद्यापीठ जयपूरनगरमध्ये  बापूनगर येथे आहे.  या विद्यापीठाअंतर्गत सहा संघटक कॉलेज, 11 मान्यताप्राप्त संशोधन केंद्र, 37 पदव्युत्तर विभाग, 305 महाविद्यालय आहेत. NAAC ने विद्यापीठाला  A+ दर्जा दिला आहे. 


मोहन रानडे  यांच्यासह 23 जणांना 24 वर्षाची शिक्षा (mohan ranade)-
1957 मध्ये गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह 23 जणांना 24 वर्षांची शिक्षा झाली होती. भारत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे गोवा स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक वर्षे ते पोर्तुगालमधील तुरुंगात होते. अखेर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री अण्णादुराई यांनी पोपकडे केलेल्या मध्यस्थीमुळे 1969 मध्ये त्यांची सुटका झाली. त्यांना गोवा पुरस्कार, पद्मश्री आणि सांगली भूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले.


सुषमा मुखोपाध्याय यांचं निधन (Sushma Mukhopadhyay)-
भारताच्या पहिल्या महिला  पायलट सुषमा मुखोपाध्याय यांचं निधन आजच्याच दिवशी निधन झालं होतं. 8 जानेवारी 1984 मध्ये सुषमा मुखोपाध्याय यांनी अखेरचा श्वास घेतला होता. 1910 मध्ये सुषमा मुखोपाध्याय यांचा जन्म झाला होता. सुषमा मुखोपाध्याय यांच्यामुळे भारतातील महिलांना नवी दिशा मिळाली. त्या वैमानिक क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुढे आल्या... 


1986 : केजीएफ स्टार यशचा जन्म (Naveen Kumar Gowda,) -
केजीएफ सिनेमानं वेड लावणारा कन्नड अभिनेता यश याचा 1986 मध्ये आजच्याच दिवशी जन्म झाला होता.  नवीन कुमार गोवडा असं त्याचं पूर्ण नाव आहे. चाहते त्याला यश या नावानेच ओळखतात. केजीएफ हा सिनेमा कन्नडसह पॅन इंडिया लेव्हलवर गाजला होता. अनेकांनी यशच्या लूकची कॉपीही केली होती.  2007 मध्ये यशने आपलं फिल्मी करिअर सुरु केलं होतं. 
 
इतर महत्वाच्या घटना -


1889 : डॉ. हर्मन होलरिथ यांना संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले. अमेरिकेच्या जनगणनेत 1890 मध्ये या गणकयंत्राचा उपयोग करण्यात आला होता. हर्मन होलरिथ यांचं गणकयंत्र काळाच्या पुढील होतं. 


1884 - ब्राम्हो समाजातील समाजसुधारक आणि लोकसेवक कशवचंद्र सेन यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं. 


1924:  स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या गीता मुखर्जी यांचा जन्म झाला होता.  


1925 : राकेश मोहन  यांचा जन्म - 
हिंदी नाटककार, कांदबरीकार आणि कथाकार मोहन राकेश यांचा जन्म.. अमृतसरमधील एका सामान्य पंजाबी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील वकील होते, तरी आर्थिक परिस्थिती ओढाताणीची होती.  पाच डिसेंबर 1973 मध्ये राकेश मोहन यांचं निधन झालं. 


1929 : नेदरलँड आणि वेस्ट विडिंज या दोन देशांमध्ये पहिल्यांदाच टेलिफोनवर संपर्क झाला.


1961 : अल्जीरियासाठी आजच्याच दिवशी फ्रान्समध्ये जनमत घेण्यात आले होतं. यामध्ये अल्जीरियाच्या बाजूनं 75 टक्के मत मिळाली होती.   


1971 : शेख मुजीबुर रहमान यांची पाकिस्तानचे राष्ट्रपती झुल्फिकार अली भुट्टो यांनी जेल मधून सुटका केली. 


1973 : रशियाने आजच्याच दिवशी मिशन ल्‍यूना 21 या स्पेस मिशनचे प्रक्षेपण केले होते.


1973 - प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व भारतीय पत्रकारितेचे पितामह नानासाहेब परुळेकर यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं. नानासाहेब परुळेकर हे स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी पत्रकारितेतील सदैव स्मरणात रहावे असे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते.  


1987 - माजी भारतीय क्रिकेटपटू नाना जोशी यांचं निधन


2001 : भारत आणि व्हिएतनाम या दोन देशामध्ये सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या होत्या.