Tirumala Tirupati Devasthanam : देशातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असल्यानं तसेच  नियम शिथिल झाल्यानं तिरूपती देवस्थानाला भाविक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. त्यामुळे आता तिरूमाला तिरूपती देवस्थानानं (Tirumala Tirupati Devasthanam) मोठा निर्णय घेतला आहे. तिरूपती देवस्थान आता स्लॉटेड सर्व दर्शन (SSD) टोकनची संख्या वाढवणार आहे. तसेच व्यंकटेश्वर भगवान दर्शनासाठी आणखी तिकिटे जाहिर केली जाणार आहेत. रिपोर्टनुसार, आज ऑफलाइन बुकिंगसाठी 20 हजार एसएसडी तिकिटं जाहिर करण्यात येणार आहेत. तसेच 300 रुपयांच्या श्रेणीची 25000 तिकिटे देखील जाहिर केली जाणार आहेत.  


गेल्या आठवड्यात तिरुमाला तिरुपती देवस्थानानं 15,000 ऑफलाइन स्लॉटेड सर्व दर्शन टोकन (SSD) जाहिर केले होते. जेव्हा भक्तांची संख्या सर्वदर्शन टोकनच्या दैनंदिन कोट्यापेक्षा जास्त असते, तेव्हा  तिरूपती देवस्थान पुढील दिवसांसाठी भक्तांना तिकिटे जाहिर करते.


रिपोर्टनुसार लवकरच तिरूपती देवस्थान हे कोरोनापूर्वी जेवढी तिकीट भाविकांना दर्शनासाठी देत होते, तेवढीच तिकीटे आता पुन्हा देणार आहेत. 


16 फेब्रुवारी रोजी झाले होते एका दिवसातील सर्वाधिक दान
16 फेब्रुवारी रोजी तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या दानपेटीत 84 कोटी रूपये जमा झाले  होते. तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष वाय व्ही सुब्बा रेड्डी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, सुमारे 70 देणगीदारांनी 84 कोटी दान केले होते. मंदिर संस्थेने प्रत्येक देणगीदाराला विशेषाधिकार म्हणून एक उदयस्थान सेवा तिकीट मोफत दिले होते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha