Gold Silver Prices Today : बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सराफा बाजारात वरच्या पातळीवरून नफा बुकींग केल्यामुळे घसरण दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे. असं असलं तरी मागील दोन दिवसात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली असल्याचे पाहायला मिळाले. आज सोने 141 रुपयांनी स्वस्त होऊन प्रति 10 ग्राम सोन्याची किंमत 50,389 रुपये झाली आहे.  तर चांदीची किंमत 129 रुपयांनी कमी होऊन चांदी आता प्रति किलो 64,229 रुपये इतकी झाली आहे.


आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमती


मागील काही महिन्यात सोन्याने नऊ महिन्यांच्या उच्चांकी पातळी गाठली होती. युक्रेन-रशिया तणावाचा प्रभावही जागतिक बाजारावर पडला आहे. ज्यामुळे सोन्या-चांदीचे दर वधारले होते. सोने 1 जून नंतरची सर्वोच्च पातळी गाठत प्रति औंस 1,898.63 डॉलरवर पोहोचले होते. जे मंगळवारी 1,913.89 प्रति डॉलर औंसवर आले आहे. दरम्यान, अमेरिका गोल्ड फ्युचर्स 0.3 टक्क्यांनी घसरून 1,901.90 डॉलरवर बंद झाले. याशिवाय, इतर धातूंच्या तुलनेत चांदीचा भाव 0.2 टक्क्यांनी वाढून 24.13 डॉलर प्रति औंस झाला.


प्रमुख भारतीय शहरांमध्ये सोने आणि चांदीच्या किमती



  • नवी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 46,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 64,400 रुपये प्रति किलो आहे. 

  • मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 46,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 64,400 रुपये प्रति किलो आहे. 

  • कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 64,400 रुपये प्रति किलो आहे. 

  • चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 69,100 रुपये प्रति किलो आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: