एक्स्प्लोर

एसबीआय बँक कर्मचाऱ्याच्या मुलाने उघडली चक्क डुप्लीकेट स्टेट बँक ब्रँच; शाखा बघून अधिकारीही थक्क!

तामीळनाडू राज्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी बँक कर्मचाऱ्याच्या मुलाने डुप्लीकेट स्टेट बँक ब्रँच सुरू केली होती. या शाखेचं ऑफिस बघून अधिकारी देखली थक्क झाले.

चेन्नई : बँकेत चोरी करण्यासाठी चोर काय शक्कल लढवतील याची गॅरंटी नाही. आता तर ऑनलाईन बँक फ्रॉडच्या घटना देखील वाढल्या आहेत. मात्र, तामिळनाडू राज्यात एक अशी घटना समोर आलीय, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय. कुडलूर जिल्ह्यातील परूती येथे चक्क स्टेट बँक ऑफ इंडियाचीच (SBI) डुप्लिकेट शाखा चालवण्यात येत होती. या प्रकरणी तामिळनाडू पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे यातील मुख्य आरोपी कमल बाबू हा अवघा 19 वर्षांचा असून तो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. त्याने त्याच्या संपर्कातील लोकांच्या मदतीने एसबीआयची शाखा सुरू करण्यासाठी संगणक, लॉकर, चालान आणि बनावट कागदपत्रे आणली होती. पनरुती बाजार शाखेच्या नावावर एक वेबसाइट देखील तयार केली आहे. बाबू याने साथीदार ए कुमार (वय 42) आणि एम मण्णीकम (वय 52) यांच्या मदतीने एप्रिल महिन्यात शाखा उघडली. लॉकडाऊनमध्ये आपल्याला कोणी पकडणार नाही, असा त्यांचा समज होता. कर्जाच्या हफ्त्यांसाठीचा बँकांनी दिलेला दिलासा पडू शकतो 'महागात'! ग्राहकामुळे बँकेचा भांडाफोड एसबीआयच्या एका ग्राहकाने उत्तर बाजारपेठेत नव्याने उघडलेल्या शाखेची माहिती शहरातील विद्यमान शाखेच्या व्यवस्थापकाला विचारल्यानंतर ही शाखा रडारवर आली. डुप्लीकेट शाखेतून घेतलेली पावती एका ग्राहकाने दाखवल्यानंतर मॅनेजर आणि इतर अधिकारी बनावट शाखेत गेले. तिथे मूळ बँकेच्या शाखाप्रमाणेच सेट पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने पररुती पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर तिघांना भारतीय दंड संहितेच्या कलम 473, 469, 484, 109 अन्वये अटक करण्यात आली. Wadhwan Property Seized | वाधवान बंधूंची 1411कोटींची संपत्ती जप्त, येस बॅंक घोटाळ्याप्रकरणी कारवाई

महत्त्वाच्या बातम्या

महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget