Rahul Gandhi Video: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी गेल्या काही दिवसांपूर्वी तामिळनाडूचा (Tamil Nadu) दौरा केला. यादरम्यान, राहुल गांधी तामिळनाडूच्या मूलगुमुदनच्या (Mulagumoodu) सेंट जोसेफ शाळेची पाहणी केली. तिथे त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत पारंपरिक नृत्य केलं. राहुल गांधी यांनी आज म्हणजेच शनिवारी संध्याकाळी त्यांच्या ट्विटर हँडलवरून तामिळनाडू दौऱ्याचा एक व्हिडिओ शेअर केलाय. "सेंट जोसेफ शाळेतील मित्रांशी बोललो आणि एकत्र जेवण केलं. त्यांच्या दिल्ली भेटीने दिवाळी अधिक खास बनवली. हा संस्कृतींचा संगम आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे आणि ती वाचवली पाहिजे", असं राहुल गांधींनी म्हटलंय.


या व्हिडिओच्या माध्यमातून राहुल गांधींनी असं म्हटलंय की, काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूच्या मूलगुमुदनच्या सेंट जोसेफ शाळेला भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत रात्रीचे जेवण करत असताना आमच्यात खूप मनोरंजक संभाषण झालं. दरम्यान, जर तुमचे सरकार स्थापन झाले तर, पंतप्रधान म्हणून पहिला निर्णय कोणता घेणार? असा प्रश्न एका व्यक्तीने राहुल गांधींना विचारला. तेव्हा राहुल गांधींनी सर्वप्रथम महिलांना आरक्षण देऊ, असे म्हटले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, जर मला कोणी विचारले की तुम्ही तुमच्या मुलाला काय शिकवाल? तर मी नम्रतेने म्हणेन. कारण नम्रतेने तुम्हाला समज येते. 


राहुल गांधींचे ट्वीट-



काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने निशाणा साधला आहेत. त्यांनी आज  एलपीजीच्या दरवाढीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीय. मोदींच्या विकासाचे वाहन रिव्हर्स गियरमध्ये असून ब्रेकही निकामी झाल्याचा आरोप केलाय. एलपीजीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे लाखो कुटुंबांना स्टोव्ह पेटवावा लागत आहे, असाही टोला त्यांनी नरेंद्र मोदींना लगावलाय. 


हे देखील वाचा-