एक्स्प्लोर

जयंती विशेष : डॉ. अब्दुल कलाम यांचं 'हे' स्वप्न अधुरंच राहिलं!

देशाचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं पायलट बनण्याचं स्वप्न होतं. मात्र या स्वप्नाच्या जवळ पोहोचूनही त्यांचं ते स्वप्न अधुरंच राहिलं.

नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती आहे. भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन अशा अनेक नावांनी त्यांना ओळखलं जातं. ‘मिसालईल मॅन’ अशी ओळख असणारे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचं पायलट बनण्याचं स्वप्न होतं... आणि ते त्यांच्या या स्वप्नाच्या जवळ पोहोचलेही होते. मात्र, इंडियन एअरफोर्समध्ये आठ जागा रिक्त होत्या. मात्र, मुलाखतीत कलाम यांचा नववा क्रमांक होता. त्यामुळे कलाम यांना पायलट होणं शक्य झालं नाही. डॉ. कलाम यांनी याबाबत त्यांच्या “My Journey: Transforming Dreams into Actions” या पुस्तकात लिहिलं आहे. मद्रास टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करताना डॉ. कलाम यांचं भविष्यात पायलट होण्याचं स्वप्न होतं. “माझं स्वप्न होतं की, अवकाशात उंच उडावं आणि तिथून मशिन कंट्रोल करावी.”, असे डॉ. कलाम यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. डॉ. कलाम यांनी एअरफोर्समध्ये पायलट होण्याच्या दृष्टीने प्रयत्नही केलेले. त्यासाठी त्यांना दोन ठिकाणांहून मुलाखतीची निमंत्रणं आली. पहिलं निमंत्रण होतं देहरादूनच्या इंडियन एअरफोर्सकडून, तर दुसरं निमंत्रण होतं दिल्लीतील संरक्षण मंत्रालयाच्या तंत्रज्ञान आणि उत्पादन संचालनालयाकडून.. कलाम यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की, संरक्षण खात्याला मुलाखत देणं शक्य होतं. मात्र, संरक्षण मंत्रालय उमेदवारांकडून काही विशेष गुणांची अपेक्षा करत होता. तिथे 25 मुलांची निवड झाली होती. या 25 मुलांमध्ये डॉ. कलाम नवव्या स्थानावर होते आणि संरक्षण खात्याकडे केवळ 8 जागा रिक्त होत्या. “एअरफोर्सचं पायलट बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यात मी अपयशी ठरलो. त्यानंतर मी ऋषिकेशला जाऊन नव्या दिशेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.”, असे डॉ. अब्दुल कलाम त्यांच्या पुस्तकात लिहितात. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी या पुस्तकात त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग, किस्से, शिक्षण आणि प्रेरणादायी अनुवभव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित बातमी : जयंती विशेष : पेपर टाकणारा मुलगा ते देशाचा राष्ट्रपती, डॉ. कलाम यांचा प्रेरणादायी प्रवास

महत्त्वाच्या बातम्या

Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
Embed widget