नवी दिल्ली: डिफेन्स कॉलनीमधील आनंद लोक परिसरात दिल्लीतील आतापर्यंची सर्वात मोठी चोरी झाली आहे. जेट एअरवेजच्या व्हाईस प्रेसिडंटच्या (सिक्युरिटी) मुलीच्या घरातून चोरांनी तब्बल3 कोटी रुपयांचे दागिने लंपास केले असून, काही रोख रक्कमही चोरली आहे.

 

डिफेन्स कॉलनीतील ही चोरी दिल्लीत एखाद्या घरात झालेल्या चोरींपैकी सर्वात मोठी चोरीची घटना मानली जाते आहे. चोरी झालेल्या घरातील कुटुंब एका लग्नसोहळ्यासाठी बाहेर गेले असताना, चोरांनी संधी साधली.

 

जेट एअरवेजच्या अधिकाऱ्याच्या ही चोरीची घटना घडली असून, त्या रविवारी रात्री संपूर्ण कुटुंब लग्नसोहळ्यासाठी घराबाहेर होतं. जेव्हा लग्नसोहळ्यातून घरी परतले, त्यावेळी घटना समोर आली.

 

या घटनेबाबत पोलिसांना तातडीने कळवण्यात आले असून, पोलिसांनी तपासही सुरु केला आहे. फिंगरप्रिंट्स, सीसीटीव्ही कॅमेरा यांच्या मदतीने तपास सुरु झाला आहे. शिवाय, परिसरातील संशयित व्यक्तींचीही चौकशी करण्यात येत आहे.