मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं गुरुवारी 16 ऑगस्ट रोजी निधन झालं. वयाच्या 93 व्या वर्षी वाजपेयींनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर देश-परदेशातून अनेक जणांनी आठवणींना उजाळा दिला आहे.

पाकिस्तानच्या भूमीवर टीम इंडियाने 2004 साली मिळवलेला विजय कोण विसरेल? तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुढाकारामुळेच भारताचा हा ऐतिहासिक दौरा घडला. पाकिस्तान दौऱ्यापूर्वी वाजपेयींनी टीम इंडियाचा तत्कालीन कर्णधार सौरव गांगुलीला 'हम होंगे कामयाब' हे गाणं ऐकवलं होतं.

टीम इंडियाचे तत्कालीन मॅनेजर रत्नाकर शेट्टी यांनी एका मुलाखतीत वाजपेयी आणि भारतीय क्रिकेट संघाच्या भेटीचा किस्सा सांगितला होता. 'भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारावेत, अशी अटलजींची इच्छा होती. क्रिकेट हा त्यासाठी दुवा ठरला. अटलजींमुळेच हा दौरा शक्य झाला. सरकारच्या मंजुरीनंतर बीसीसीआयने आपला संघ पाकमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला' असं शेट्टींनी सांगितलं.

'फक्त सामना जिंकू नका, मनंही जिंका' असा कानमंत्र वाजपेयींनी सौरव गांगुलीला दिला होता. भारतीय क्रिकेट संघ तब्बल 19 वर्षांनी पाकिस्तानात गेला होता. संघात गांगुलीसोबत सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग असे दिग्गज होते.

'पाकिस्तान दौऱ्यावर निघण्यापूर्वी पंतप्रधान कार्यालयातून आम्हाला मेसेज आला. पंतप्रधानांना आमच्या टीमला भेटायचं होतं. बागेत नेव्ही पथक देशभक्तिपर गाणी वाजवत होतं. अटलजींनी आमच्यासोबत जवळपास तासभर गप्पा मारल्या. विशेष म्हणजे प्रत्येकाशी ते बोलले.' असं रत्नाकर शेट्टी सांगतात.

'आमच्या क्रिकेटपटूंचे ऑटोग्राफ असलेली एक बॅट आम्ही वाजपेयीजींना दिली. त्यांनीही आम्हाला एक बॅट भेट दिली. त्यावर लिहिलं होतं खेल ही नही, दिल भी जीतिये, शुभेच्छा' ही आठवण शेट्टींनी सांगितली.

'हा महत्त्वाचा दौरा आहे. सर्वांनी मनापासून खेळा, असं अटल बिहारीजींनी सांगितलं. आम्ही निघताना त्यांनी आम्हाला आणखी एक गाणं ऐकायला सांगितलं- हम होंगे कामयाब' हा किस्सा सांगतानाही शेट्टींना शहारे येतात.

भारताने वनडे मालिका जिंकल्यानंतर वाजपेयींनी गांगुलीला फोन करुन शुभेच्छा दिल्या होत्या.


'टीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी मी सुरक्षेची पाहणी करण्यासाठी पाकिस्तानला गेलो होतो. कराचीमधील जनता हातात वाजपेयींचे फोटो आणि पोस्टर घेऊन उभी होती. भारत-पाकमध्ये क्रिकेट पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांनी अटलजींचे आभार मानले. ही गोष्ट मी अटलजींना सांगितली' असंही रत्नाकर यांनी सांगितलं.

पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका भारताने 2-1 ने, तर वनडे मालिका 3-2 ने जिंकली. मुलतानमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत 309 धावा ठोकल्यानंतर सेहवागला 'मुलतान का सुलतान' हे नाव मिळालं. इंझमाम उल हक पाकिस्तानचा कर्णधार होता, त्यालाच मालिकावीर हा पुरस्कार मिळाला.

संबंधित बातम्या 


अटल बिहारी वाजपेयींच्या प्रेरणादायी कविता

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची संपत्ती...

जेव्हा अटलजी पंढरपुरात विठ्ठलदर्शनासाठी आले होते...

सिनेमा, गाणी, रंग, खेळ, कवी... वाजपेयींच्या आवडी-निवडी काय होत्या?

वाजपेयींचं निधन, ‘कारगिल’ हरलेल्या पाकिस्तानची प्रतिक्रिया

मी अविवाहित, पण ब्रम्हचारी नाही, छातीठोकपणे सांगणारे वाजपेयी

मी नि:शब्द आणि शून्यात, मोदींची प्रतिक्रिया, वाजपेयींच्या निधनाने देश हळहळला

आणखी एक भीष्म पितामह गमावला, उद्धव ठाकरेंकडून शोक व्यक्त

अटल बिहारी वाजपेयींना जडलेला डिमेन्शिया नेमका काय?

हेमा मालिनीचा 'सीता और गीता' वाजपेयींनी 25 वेळा पाहिला!

जीवनपट प्रदर्शित होण्यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी कालवश

अटल बिहारी वाजपेयी यांनी शेवटचं भाषण कधी केलं?

अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी निगडीत 15 रंजक गोष्टी

वाजपेयींमुळे मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो: मनोहर जोशी

राजकारणातला महाऋषी हरपला, अटल बिहारी वाजपेयींचं निधन

हार नहीं मानूँगा, रार नयी ठानूँगा; वाजपेयी-हळव्या मनाचे कवी आणि पत्रकार

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन