नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नवी दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती या ठिकाणी अटलजींवर अंत्यसंस्कार होतील.


हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी देशाचे माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान यांची समाधीस्थळं आहेत. त्यामुळेच या स्थळाला ‘राष्ट्रीय स्मृती’ असं नाव देण्यात आलं आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची संपत्ती... 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या राजघाटावरील स्मृतीस्थळापासून राष्ट्रीय स्मृती स्थळाची सुरुवात होते.

या स्मृतीस्थळावर पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, के आर नारायणन यांच्यासह विविध माजी पंतप्रधान-राष्ट्रपतींच्या समाधी आहेत.

राष्ट्रीय स्मृतीस्थळ

राष्ट्रीय स्मृतीस्थळावर ज्या ठिकाणी वाजपेयींचं स्मारक असेल ते ठिकाण हे पंडित नेहरु यांचं समाधीस्थळ शांतीवन आणि लालबहादूर शास्त्री यांचं स्मारक विजय घाट यांच्या मध्ये आहे.



स्मारकासाठी स्वतंत्र जागा कमी पडू लागल्यानंतर एकाच ठिकाणी राष्ट्रीय स्मृती नावाने पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची स्मारकं बनवली गेली आहेत.

राष्ट्रीय स्मृतीस्थळावर ग्यानी झेलसिंग- एकता स्थळ, के आर नारायणन- उदय भूमि, शंकर दयाळ शर्मा -कर्मभूमी, चंद्रशेखर -जननायक स्थळ, इंदिरा गांधी यांचं शक्ती स्थळ, राजीव गांधी यांची वीरभूमी, चौधरी चरण सिंग यांची किसान भूमी अशी समाधी स्थळांची नावं आहेत.



संबंधित बातम्या 

अटलअस्त! वाजपेयींच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार  

वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला मोदी, मनमोहन, सोनियांसह दिग्गजांची हजेरी  

अटल बिहारी वाजपेयींच्या प्रेरणादायी कविता  

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची संपत्ती...  

राजकारणातला महाऋषी हरपला, अटल बिहारी वाजपेयींचं निधन 

मी नि:शब्द आणि शून्यात, मोदींची प्रतिक्रिया, वाजपेयींच्या निधनाने देश हळहळला 

मी अविवाहित, पण ब्रम्हचारी नाही, छातीठोकपणे सांगणारे वाजपेयी 

वाजपेयींचं निधन, ‘कारगिल’ हरलेल्या पाकिस्तानची प्रतिक्रिया