नवी दिल्ली : देशभरात हा राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या राम नवमीच्या उत्सवावरही नवी  कोरोनाचं सावट आहे. देशभरात कोरोनाच्या सावटात यंदाचा राम नवमी उत्सव साजरा केला गेला. ओडिसा येथील एका कलाकराने रामनवमीचे औचित्य साधून श्रीरामाची 4.1 सेमी. उंचीची एक लाकडी मूर्ती तयार केली. ही प्रभू श्रीरामाची जगातील सर्वात लहान मूर्ती असल्याचा दावा या कलाकाराने केला आहे. 


सत्यनारायण मोहराना असे या कलाकाराचे नाव आहे. मोहराना ओडिसातील गंजम जिल्ह्यात राहतात. मोहराना म्हणाले, ते मंदिरात जात नाही घरातच प्रभू प्रभू श्रीरामचंद्रांची पूजा करतात. देशासह राज्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. दररोज कोरोनाबाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठत आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात अनेक कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे भाविकांनी मंदिरात न जाता घरातच प्रभू श्रीरामचंद्रांची पूजा करण्याचे आवाहन मोहराना यांनी केले आहे. 


 






विठुरायाच्या गाभाऱ्यात फळा-फुलांचा बहर, रामनवमीनिमित्त आकर्षक सजावट



आज चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी निमित्त विठुरायाच्या मंदिराला रंगीबेरगी फुले आणि फळांची रंगसंगती साधत आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोरोणाच्या संकटामुळे सध्या विठुराया कुलूपबंद असला तरी मंदिरातील वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरा मात्र नियमितपणे सुरु आहेत. गंगाखेड येथील भाविक गोविंदराव तांदळे यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे. झेंडू, जरबेरा, गुलछडी या फुलांसह अननसाचा वापर कल्पकतेने या सजावटीत करण्यात आला आहे. विठ्ठल रुक्मिणी गाभारा, सोळखंबी, चौखंबी येथे केलेल्या सजावटीमध्ये विठुरायाचे मंदिर खुलून उठले आहे.