एक्स्प्लोर

Industry Index : आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकात 18.1 टक्क्यांची वाढ, पाहा कोणत्या क्षेत्रात किती वाढ

वीज, सिमेंट, कोळसा आणि खतांशी संबंधित उद्योगांच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकात 18.1 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Industry Index : आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकात 18.1 टक्क्यांची वाढ झाली आहे. मे 2021 मधील आकडेवारीशी तुलना करता मे 2022 मध्ये झालेली वाढ ही मोठी आहे. वीज, सिमेंट, कोळसा आणि खतांशी संबंधित उद्योगांनी मोठी वाढ दर्शवली आहे. मे 2022 मध्ये हा निर्देशांक 148.1 इतका राहिला आहे. कोळसा उत्पादन क्षेत्रात 25.1 टक्क्यांची, खत उत्पादनात 22.8 टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. तर सिमेंट उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांनी 26.3 टक्क्यांची तर उर्जा निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांनी 22 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

दरम्यान, सिमेंट, कोळसा,खते आणि वीज निर्मिती क्षेत्रातील उद्योगांनी मे 2022 मध्ये गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत मोठी वाढ नोंदवली आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने मे 2022 साठीचा आठ प्रमुख उद्योगांचा निर्देशांक आज जाहीर केला. या निर्देशांकाच्या माध्यमातून कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, शुद्धीकरण उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि उर्जा निर्मिती या निवडक आठ प्रमुख उद्योगांच्या संयुक्त आणि व्यक्तिगत कामगिरीचे मापन केले जाते. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात या आठ उद्योगांचा 40.27 टक्के वाटा आहे. 

फेब्रुवारी 2022 या महिन्यासाठीचा आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकाचा अंतिम विकासदर 5.8 टक्क्यांच्या तात्पुरत्या पातळीवरून 5.9 टक्के झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत एप्रिल-मे 2022-23 मध्ये प्रमुख उद्योगांचा निर्देशांक 13.6 टक्के होता.

आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकाची माहिती

कोळसा : मे 2021 च्या तुलनेत कोळसा उत्पादन (भार 10.33 टक्के) मे 2022 मध्ये 25.1 टक्क्यांनी वाढले आहे.

खनिज तेल : मे 2021च्या तुलनेत खनिज तेल उत्पादन (भार  8.98 टक्के) मे 2022 मध्ये 4.6 टक्क्यांनी वाढले.

नैसर्गिक वायू : मे 2021च्या तुलनेत नैसर्गिक वायू निर्मिती (भार  6.88 टक्के) मे 2022 मध्ये 7.0 टक्क्यांनी वाढली आहे.

पेट्रोलियम शुद्धीकरण उत्पादने : पेट्रोलियम शुद्धीकरण उत्पादनांची (भार  28.04 टक्के) निर्मिती मे 2021 च्या तुलनेत मे 2022 मध्ये 16.7 टक्क्यांनी  वाढली.

खते : मे 2021 च्या तुलनेत खतांचे उत्पादन (भार  2.63 टक्के) मे 2022 मध्ये 22.8 टक्क्यांनी वाढले.

पोलाद निर्मिती : मे 2021च्या तुलनेत पोलाद निर्मिती (भार  17.92 टक्के) मे 2022 मध्ये 15.0 टक्क्यांनी वाढली

सिमेंट उत्पादन : मे 2021च्या तुलनेत सिमेंटचे उत्पादन (वजन 5.37 टक्के) मे 2022 मध्ये 26.3 टक्क्यांनी  वाढले.

वीज निर्मिती : मे 2021च्या तुलनेत वीज निर्मिती (वजन 19.85 टक्के) मे 2022 मध्ये 22.0 टक्क्यांनी वाढले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Embed widget