Jammu-Kashmir:  जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) राजौरीमध्ये शुक्रवारी भारतीय लष्कर (Indian Army) आणि दहशतवाद्यांनमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारतीय लष्कराचे पाच जवान शहीद झाले आहेत. राजौरीच्या मुठभेड जिल्ह्याच्या जंगलात दहशतवादी (Terrorist) आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली. त्यामुळे आता संपूर्ण राजौरीमध्ये इंटरनेटची सेवा बंद करण्यात आली आहे. 


भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीदरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात लष्कराचे दोन जवान शहीद झाले. तर या हल्ल्यात एका लष्कराच्या अधिकाऱ्यासह चार जवान जखमी झाले आहेत. 


दहशतवाद्यांना लष्कराचे चोख उत्तर 


भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीमध्ये दहशतवाद्यांना भारतीय लष्कराकडून चोख उत्तर देण्यात आले आहे. या मोहिमेसाठी अतिरिक्त सैन्य बल पाठवले असल्याचं देखील लष्कराने सांगितलं. तसेच ही चकमक अजूनही सुरु असल्याचं लष्कराकडून सांगण्यात येत आहे. 


भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, जम्मूमधील भाटा धुरियनच्या भागात लष्कराच्या ट्रकवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यासाठी लष्कराचे जवान सतत गुप्तचर यंत्रणांवर आधारित मोहीम करत आहेत. 3 मे 2023 रोजी राजौरी सेक्टरच्या कंडी जंगलात दहशतवाद्यांच्या माहिती भारतीय लष्कराला मिळाली आणि या चकमकीला सुरुवात झाली. 


दहशतवाद्यांनी केला बॉम्ब हल्ला


अधिकाऱ्यांनी सांगितले की, "आज सकाळी 7.30 च्या सुमारास एका शोध पथकाला एका गुहेत दहशतवाद्यांचा एक गट लपल्याची माहिती मिळाली. हा परिसर खडकाळ आणि उंच खडकांनी वेढलेला आहे. जेव्हा सुरक्षा दल तिथे पोहोचले तेव्हा दहशतवाद्यांनी प्रत्युत्तर दिले. " स्फोट झाला. यात पाच जवान शहीद झाले, तर एका अधिकाऱ्यासह चार जण जखमी झाले. 


वृत्तानुसार, जवळपासच्या भागातील अतिरिक्त पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. जखमी जवानांना उधमपूर येथील कमांड रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार,  या भागात दहशतवाद्यांचा एक गट अडकला आहे. दहशतवाद्यांचाही घातपात होण्याची शक्यता आहे. ही मोहीम सुरू असून मृतांच्या स्थितीबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा 13वा दिवस, न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करणार असल्याची कुस्तीपटूंची भूमिका