एक्स्प्लोर

तेलंगणाचे लवकरच स्वतंत्र परराष्ट्र मंत्रालय

हैदराबाद: आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन निर्माण झालेल्या तेलंगणा या राज्याचे लवकरच स्वतंत्र परराष्ट्र मंत्रालय स्थापन होणार आहे. या खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री सी. चंद्रशेखरराव यांचे पुत्र के. तारक रामाराव यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.   दोन देशातील संबंध जपण्याची जबाबदारी केंद्र सरकरची असते, यासाठीच केंद्राचे परराष्ट्र खाते कार्यरत असते. पण असे असतानाही तेलंगणा राज्य स्वतंत्र परराष्ट्र मंत्रालय निर्माण करण्याच्या तयारीत आहे. या मंत्रालयाच्या स्थापनेची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले.   राज्यातून इतर देशात स्थाइक झालेल्या नागरिकांची संख्या पाहता. त्यांच्या हक्कांसाठी स्वतंत्र एनआरआय धोरण तेलंगणाचे राज्य सरकार तयार करीत आहे. त्यासाठी के.टी.रामाराव यांच्याकडे या खात्याचा कार्यभार देण्यात येणार आहे. के.टी.रामाराव एनआरआय नागरिकांचे हक्क सुरक्षित करण्याचा प्रयत्न असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.   के.टी.रामराव हे तेलंगणातील सर्वात जास्त खात्यांचे मंत्री असून, त्यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान, उद्योग आणि वाणिज्य, महापालिका प्रशासन आणि शहर विकास आदी मंत्रालयांचा कारभार आहे.   ''तेलंगणातून स्थाइक एनआरआय नागरिकांकडून अशाप्रकारच्या मंत्रालयाची मागणी सातत्याने होत होती. हे मंत्रालय एनआरआय नागरिकांच्या हक्कांसह तेलंगणामधील गुंतवणुक वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. के.टी.रामाराव यांच्या कामाची शैली आणि प्रशासनावरील पकड पाहता, तेच यासाठी योग्य आहेत," यावेळी भुवनगरीचे खासदार बी.एन. गौड यांनी सांगितले.   इतर देशात वसलेल्या एनआरआय नागरिकांसाठी धोरण ठरवण्यात येत आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी 16 जुलै शुक्रवारी बैठक घेणार असल्याचे केटीआर यांनी सांगितले.   सध्या केरळ आणि पंजाबमधून सर्वात जास्त स्थलांतरीत होऊन इतर देशात वसलेल्यांची संख्या जास्त आहे. एनआरआय नागरिकांच्या हक्काबाबत केरळ आणि पंजाब या व्यतिरिक्त कोणतेही राज्य सरकार जागरूक नाही. त्यामुळे, या दोन्ही राज्यांनी ठरवलेल्या धोरणांचा अभ्यास करून राज्य सरकारचे धोरण निश्चित करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
जर अमेरिका आणि पाकिस्तान युद्ध झालं तर आपण पाकिस्तानसोबत राहावं, कारण ते आपले शेजारी, राजस्थान भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा व्हिडिओ व्हायरल
अमेरिका- पाकिस्तान युद्ध झाल्यास आपण पाकिस्तानसोबत, ते आपले शेजारी : मदन राठोड
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
Embed widget