एक्स्प्लोर

तरुणाने मुलाचं अपहरण करुन खंडणीत गर्लफ्रेण्ड मागितली!

आरोपी ट्रेनने प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

हैदराबाद/पुणे : अपहरण केल्यानंतर अपहरणकर्त्यांकडून पैशांची मागणी होणं ही सर्वसामान्य बाब आहे. परंतु हैदराबादमध्ये अपहरणकर्त्यांने अपहृत मुलाच्या कुटुंबाकडून चक्क आपल्या प्रेयसीची मागणी केली. मात्र पोलिसांनी अपहरणकर्त्याचा कट हाणून पाडला आणि सोमवारी सकाळी (9 एप्रिल) पुणे स्टेशनवरुन अपहृताची सुटका केली. तेलंगणाच्या वानपर्ती जिल्ह्याच्या कोथाकोटामधून एका आठ वर्षीय मुलाचं अपहरण झालं होतं. परंतु तेलंगणा पोलिसांनी 24 तासातच मुलाची सुखरुप सुटका केली. काय आहे प्रकरण? महबूबनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 23 वर्षीय वामसी कृष्णने कोथाकोटामधील भारतीय विद्या मंदिर स्कूलमध्ये तिसरीत शिकणाऱ्या रतलावत चंद्रू नायक या मुलाचं अपहरण केलं होतं. आरोपीचे मुलाच्या आत्यासोबत प्रेमसंबंध होते. ती हैदराबादच्या शिवरामपल्ली परिसरात राहते. त्यांच्या प्रेमसंबंधाबाबत तिच्या कुटुंबीयांना समजलं होतं. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी वामसी कृष्णला मारहाण केली होती. तसंच इथे कधीही दिसायचं नाही, अशी धमकीही दिली होती. या प्रकारामुळे वामसी कृष्णच्या मनात अपमानित झाल्याची भावना होती. त्यामुळे वामसीने याचा बदला घेण्याचं ठरवलं. त्याने 7 एप्रिल रोजी शाळेत जाऊन व्यवस्थापना चंद्रूच्या आईचा अपघात झाल्याचं सांगितलं आणि त्याला आपल्यासोबत पाठवण्याची विनंती केली. वामसी कृष्ण आपला शेजारी असल्याचं मुलाने आणि त्याच्या दोन भावांनी व्यवस्थापनाला सांगितलं. त्यानंतर स्टाफनेही मुलाला वामसीसोबत सोडण्याची तयारी दर्शवली. पुणे रेल्वे स्टेशनवर आरोपीला बेड्या मुलाच्या दोन्ही भावांना कोथाकोटा बस स्टॅण्डवर वाट पाहण्याचं सांगून वामसी चंद्रूला सोबत घेऊन केला. यानंतर वामसीने चंद्रूच्या घरात फोन करुन तो आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला. वामसी कृष्णने मुलाच्या मोबदल्यात प्रेयसीची मागणी केली. वामसीच्या फोन कॉलनंतर  मुलाच्या कुटुंबीयांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. वानपर्ती जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षक रेमा राजेश्वरी यांनी तातडीने विशेष पथकाची स्थापना केली. पोलिसांनी अपहरणकर्त्याचा महाराष्ट्रापर्यंत पाठलाग केला. आरोपी ट्रेनने प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर तेलंगणा पोलिसांनी तातडीने सोलापूर पोलिस आणि आरपीएफ हेर यांना अलर्ट केलं. या पथकाचं नेतृत्त्व करणारे कोथाकोटाचे सोमानारायण सिंह हे देखील पुण्याला रवाना झाले होते. पुणे रेल्वे स्टेशनवर ट्रेनमधून उतरुन मुलासोबत पळून जाण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी आरोपी वामसी कृष्णच्या मुसक्या आवळल्या. त्याला अटक करुन मुलाची सुटका केली.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget