Jan Vishwas Yatra Convoy Accident : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या ताफ्याच्या गाडीला भीषण अपघात (Convoy Accident) झाल्याची बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी तेजस्वी यादव यांची बिहारमध्ये जनविश्वास यात्रा सुरु आहे. दरम्यान, तेजस्वी यादव यांच्या ताफ्याच्या गाडीला भीषण अपघात झाला असून चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, या अपघातात 10 जण जखमी झाले आहेत. 20 फेब्रुवारीपासून तेजस्वी यादव यांच्या जनविश्वास यात्रेचा प्रवास सुरू झाला. त्यांचा प्रवास मुझफ्फरपूरपासून सुरू झाला. या भेटीदरम्यान तेजस्वी सर्व 38 जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. तेजस्वीचा हा प्रवास 1 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
तेजस्वी यादव यांच्या ताफ्याच्या गाडीला भीषण अपघात
बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट वाहन आणि नागरी कार यांच्यात टक्कर झाली. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मंगळवारी पहाटे पूर्णियातील मुफसिल पोलीस ठाण्याच्या बेलौरीजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात एस्कॉर्ट वाहनाचा चालक मोहम्मद हलीम याचा जागीच मृत्यू झाला. तर, 6 पोलीस जखमी झाले आहेत. याशिवाय दुसऱ्या कारमध्ये प्रवास करणारे चार नागरिकही जखमी झाले आहेत. सर्व 10 जखमींना उपचारासाठी GMCH रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
चालकाचा जागीच मृत्यू, 10 जण जखमी
अपघात नेमका कसा घडला?
पूर्णियातील बिलौरी पॅनोरमा हाईटजवळ हा अपघात झाला. तेजस्वी यादव यांच्या जनविश्वास यात्रेच्या ताफ्यातील कारचं नियंत्रण सुटलं, दुभाजक तोडून दुसऱ्या लेनमध्ये जाणाऱ्या कारला धडकली. या कारमध्ये प्रवास करणारे इतर तीन जणही गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना उपचारासाठी जीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
जनविश्वास यात्रा दुसऱ्या टप्प्यात
सध्या तेजस्वी यांची जनविश्वास यात्रा सुरु आहे. तेजस्वी यादव यांच्या जनविश्वास यात्रेचा दुसरा टप्पा 25 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. 20 फेब्रुवारील सुरु झालेल्या या यात्रेचा समारोप 1 मार्चला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सुमारे 1400 किलोमीटरचा रोड शो होणार आहे. या यात्रेदरम्यान तेजस्वी यादर 38 जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :