Rajya Sabha Elections Result 2024 : आज तीन राज्यांमध्ये राज्यसभा निवडणुका आहेत. राज्यसभेच्या 15 जागांसाठी आज मतदान होत आहे. या जागा उत्तर प्रदेश, हिमाचल आणि कर्नाटकातील आहेत. राज्यसभेच्या 56 जागांपैकी 41 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले. तीन राज्यांतील 15 जागांसाठी आज सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी होणार असून सायंकाळीच निकाल अपेक्षित आहे.


Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेच्या 15 जागांसाठी आज मतदान


राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारी म्हणजेच मंगळवारी निवडणूक होणार आहे. 15 राज्यांतील या 56 जागांपैकी 41 जागांवर निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता फक्त उत्तर प्रदेश, हिमाचल आणि कर्नाटकचा प्रश्न अडकला आहे. उत्तर प्रदेशामधील राज्यसभा निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. येथे भाजपने आठवा उमेदवार उभा करून विरोधकांची धडधड वाढवली ​​आहे. यूपीप्रमाणेच हिमाचल आणि कर्नाटकातही उलथापालथ होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांचे निकाल आज म्हणजे 27 फेब्रुवारीलाच लागणार आहेत.


Rajya Sabha Election 2024 : आजच निकाल लागणार


उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचलमध्ये 15 जागांवर निवडणूक होणार आहे. यूपीमधून 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने माजी खासदार चौधरी तेजवीर सिंह, माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह, अमरपाल मौर्य, संगीता बलवंत, सुधांशू त्रिवेदी, साधना सिंह, नवीन जैन आणि संजय सेठ असे आठ उमेदवार उभे केले आहेत. तर समाजवादी पक्षाने जया बच्चन, रामजीलाल सुमन आणि आलोक रंजन यांना उमेदवारी दिली आहे.


Rajya Sabha Election 2024 : कर्नाटकमध्ये रंगतदार लढत


कर्नाटकमध्ये उपलब्ध चार जागांपैकी फक्त एक जागा मिळवण्याची क्षमता असतानाही भाजप-जेडी (एस) युतीने आपला दुसरा उमेदवार कुपेंद्र रेड्डी यांना समोर आणलं, त्यानंतर कर्नाटकातील राज्यसभा निवडणुकीची रंगत वाढली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक उमेदवाराला चार प्रतिस्पर्धी असलेल्या परिस्थितीत विजयासाठी 45 मते मिळवणे आवश्यक आहे. 


Rajya Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशातील रंजक लढत


उत्तर प्रदेशात भाजपने आठ उमेदवार उभे केले आहेत तर, विरोधी समाजवादी पक्षाने राज्यसभेच्या दहा जागांसाठी तीन उमेदवार उभे केले आहेत. भाजपला सात जागा मिळवण्यासाठी पुरेसा पाठिंबा असल्याने आणि सपाला तीन जागा बिनविरोध झाल्यामुळे, भाजपने संजय सेठ यांना आठवा उमेदवार म्हणून उमेदवारी दिल्यामुळे एका जागेसाठी स्पर्धात्मक शर्यतीची अपेक्षा कायम आहे.


Rajya Sabha Election 2024 : कोणत्या राज्यात निवडणूक बिनविरोध?


गुजरात, छत्तीसगड, हरियाणा, उत्तराखंड, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा राज्यातील 41 जागांवर चित्र स्पष्ट आहे. या राज्यांतील प्रत्येक जागेवर एकच उमेदवार उभा राहिला. अशा स्थितीत हे उमेदवार बिनविरोध निवडून आले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांच्या ताफ्याच्या गाडीला भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू; 10 जण जखमी