मुंबई: तुम्ही जर आयकर रिटर्न (Income Tax Return) भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ज्यांनी आयकर रिटर्न भरले आहे आणि ज्यांची माहिती ही आयकर विभागाला (Income Tax Department) थर्ड पार्टीकडून मिळालेल्या माहितीशी विसंगत आढळते असे करदाते आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. अशा करदात्यांनी त्यांची माहिती सुधारावी यासाठी एक संधी देण्यात येत आहे. 


आयकर विभागाला अशा अनेक करदात्यांची माहिती प्राप्त झाली आहे ज्यांच्या आयकर रिटर्नमध्ये दिलेली माहिती आणि थर्ड पार्टीकडून मिळालेले व्याज आणि लाभांश उत्पन्नाची माहिती यामध्ये मोठी तफावत आढळते. अशा प्रकरणांमध्ये अनेक करदाते आहेत ज्यांनी आयकर रिटर्न भरलेले नाहीत. आयकर विभागाने अशा करदात्यांची ओळख पटवली आहे. ही विसंगती दूर करण्यासाठी आयकर विभाग करदात्यांना ई-फायलिंग पोर्टलला भेट देऊन चूक सुधारण्याची संधी देत आहे. करदात्यांना एसएमएस आणि ईमेल पाठवून याची माहिती आयकर विभागाकडून देण्यात येत आहे. 


थर्ड पार्टीकडून मिळालेली माहिती विसंगत


आयकर विभागाने म्हटले आहे की, 2021-22 आणि 2022-23 या आर्थिक वर्षांसाठी दाखल केलेल्या आयकर रिटर्नमध्ये व्याज आणि लाभांश उत्पन्नाबाबत करदात्यांनी दिलेल्या माहितीमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. व्याज आणि लाभांश उत्पन्नाबद्दल थर्ड पार्टीकडून प्राप्त माहिती, म्हणजे बँका आणि ब्रोकरेज हाऊसेसची माहिती करदात्यांच्या ITR शी जुळत नाही. आयकर विभागाने सांगितले की, अनेक करदाते आहेत ज्यांनी आयकर रिटर्नही भरलेले नाही.


 ई-व्हेरिफिकेशन 2021 योजना सुरू


आयकर विभागाने सांगितले की, ही विसंगती दुरुस्त करण्यासाठी त्यांनी ई-व्हेरिफिकेशन 2021 योजना सुरू केली आहे. आयकर ई-फायलिंग वेबसाइट https://eportal.incometax.gov.in मधील  कम्पलायन्स पोर्टलमध्ये ऑनस्क्रीन सुविधा प्रदान करण्यात आली आहे, जेणेकरून ही विसंगती दुरुस्त करता येईल. प्राप्तिकर विभागाने सांगितले की, सध्या 2021-22 आणि 2022-23 या आर्थिक वर्षातील जुळणीशी संबंधित माहिती कम्पलायन्स पोर्टलवर उपलब्ध आहे. करदात्यांना एसएमएस आणि ईमेलद्वारे या विसंगतीची माहिती दिली जात आहे.


ई-फायलिंग वेबसाइटवर नोंदणी न केलेल्या करदात्यांना नोंदणी करावी लागेल असे आयकर विभागाने म्हटले आहे. जे करदाते विसंगती दुरुस्त करू शकत नाहीत ते अद्ययावत आयकर रिटर्नद्वारे त्यांचे उत्पन्न योग्यरित्या कळवू शकतात असंही आयकर विभागाने स्पष्ट केलं आहे. 


ही बातमी वाचा: