एक्स्प्लोर

तेजस एक्स्प्रेसच्या पहिल्याच फेरीत प्रवाशांचा हेडफोन्सवर डल्ला

मुंबई : मुंबई आणि गोव्याला जोडणाऱ्या सुपरफास्ट, हायटेक तेजस एक्स्प्रेसवर प्रवाशांनीच डल्ला मारला आहे. प्रवाशांनी चक्क हेडफोन्स चोरुन नेल्याचा प्रकार पहिल्याच फेरीनंतर समोर आला आहे. त्यामुळे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही चक्रावून गेले आहेत. तेजस एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी प्रवासात वापरण्यासाठी दिलेले हेडफोन्स परत करण्याचीही तसदी घेतली नाही. त्याचप्रमाणे दोन एलईडी स्क्रीन्सचंही नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. बुधवारच्या प्रवासात अनेक प्रवाशांनी हेडफोन्स न मिळाल्याची तक्रार केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. सोमवारी झालेल्या पहिल्या फेरीतच इतकं चौर्यकर्म होत असेल, तर यापुढे किती जण 'हात साफ' करतील, असा प्रश्न रेल्वे अधिकाऱ्यांना पडला आहे. मुंबई-गोवा हे 552 किमीचं अंतर आठ ते नऊ तासात पार करणारी तेजस एक्स्प्रेस जमिनीवरील 'विमान प्रवास' अशी ऐट मिरवणार आहे. मात्र त्यापूर्वीच तिला चोरट्यांचं ग्रहण लागलं आहे. सीट्सला जोडलेले एलईडी स्क्रीन्स, वायफाय, सीसीटीव्ही कॅमेरा, टी-कॉफी व्हेंडिंग मशिन अशा अनेक सोयीसुविधा तेजसमध्ये आहेत. ट्रेनमधील किमान डझनभर हेडफोन्स गायब झाले आहेत. हेडफोन परत करण्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. ज्याप्रमाणे ट्रेनमधील उशा-चादरी कोणी घरी नेत नाही, तसं हे हेडफोन्स प्रवासी ते परत करतील, अशी किमान अपेक्षा होती, असं एका रेल्वे अधिकाऱ्याने म्हटलं आहे. एका हेडफोनची किंमत रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेली नसली, तरी ते फारसे महाग नसल्याचं सांगण्यात आलं. मात्र रेल्वेच्या झालेल्या नुकसानापेक्षा प्रवाशांची मानसिकता चक्रावून टाकणारी आहे, असं अधिकाऱ्यांना वाटतं. 992 सीट्स असलेल्या तेजसचं सर्वात स्वस्त तिकीट एक हजार 185 रुपये (चेअर कार, फूड शिवाय) आहे. तर एक्झिक्युटिव्ह क्लासचं सर्वात महाग तिकीट 2 हजार 740 रुपये आहे. अत्याधुनिक सेवेनं सज्ज असलेल्या तेजस एक्स्प्रेसनं परतीच्या प्रवासातही प्रवाशांची घोर निराशा केली होती. मुंबई सीएसटीहून गोव्याकडे करमालीला थाटामाटात गेलेली तेजस एक्सप्रेस येताना मात्र दृष्ट लागल्यासारखी आली. परतीच्या प्रवासात ट्रेनमध्ये अस्वच्छता, दुर्गंधी आणि अपुऱ्या सोयींमुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. जेव्हा तेजस करमाळी स्थानकावरून निघाली,  तेव्हा ट्रेनमध्ये स्वच्छता नव्हती. तसंच ट्रेनमधील टॉयलेट्स साफ न केल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरली असं प्रवाशांचं म्हणणं आहे. दुसरीकडे एका कुटुंबाला स्वयंचलित दरवाज्यांमुळे त्रास सहन करावा लागला. त्यापूर्वी समाजकंटकांनी तेजसच्या काचेवर दगडफेक केल्याचंही समोर आलं होतं.

संबंधित बातम्या

परतीच्या प्रवासात तेजस एक्स्प्रेसमध्ये घाणीचं साम्राज्य

अवघ्या आठ तासात तेजस करमाळीत दाखल

हायटेक तेजसच्या प्रवासासाठी 780 ते 2740 रुपये तिकीट

केवळ साडे 8 तासात मुंबई-गोवा... हायटेक ‘तेजस’ सज्ज!

'तेजस'वर समाजकंटकांची वक्रदृष्टी, काचा फोडल्या

मुंबई-गोवा 8.30 तासात, तेजस एक्स्प्रेस 22 मेपासून ट्रॅकवर!

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Delhi CJP protest Jean Dreze: दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
Inflation Essential Commodities: 42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Delhi CJP protest Jean Dreze: दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
Embed widget