एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर टिकली; साडी नेसून पुरुष खासदार संसदेत
याआधीही चित्तूर मतदारसंघाचे खासदार शिवाप्रसाद यांनी विविध पद्धतीने सदनाच्या बाहेर आपला विरोध दर्शवला आहे
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याबाबत चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) केंद्र सरकारवर नाराज आहे. टीडीपीने सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची नोटीस दिली होती, पण गोंधळामुळे प्रस्ताव लोकसभेत दाखल होऊ शकला नाही.
दुसरीकडे टीडीपी आपल्या मागण्यांसाठी संसदेच्या आत आणि बाहेर सातत्याने विरोध करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून टीडीपी खासदार एन शिवाप्रसाद तेलुगू महिलेच्या वेशात संसदेत पोहोचले.
सध्याच्या अधिवेशनात विविध पद्धतीने विरोध करुन शिवाप्रसाद चर्चेत आहेत. पण आज ते गळ्यात मंगळसूत्र, साडी आणि टिकली लावून संसद परिसरात विरोध करताना दिसले. काँग्रेस खासदार रेणुका चौधरीही विरोधासाठी त्यांच्यासोबत उभ्या राहिल्या. टीडीपीच्या अविश्वास प्रस्तावाला काँग्रेस समर्थन देण्यास तयार आहे.
खासदार शिवाप्रसाद शुक्रवारी मच्छीमाराच्या वेशात संसदेत पोहोचले होते. "मोदीसाहेब संसदेत दिसत नाहीत, परदेशात फिरतात. जनतेला काय हवंय ते करत नाहीत. त्यामुळे मला त्यांना जाळ्यात पकडायचं आहे," असं ते म्हणाले. याआधीही चित्तूर मतदारसंघाचे खासदार शिवाप्रसाद यांनी विविध पद्धतीने सदनाच्या बाहेर आपला विरोध दर्शवला आहे. कधी कृष्णाच्या अवतारात तर कधी बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत संसदेत आले होते. संसद परिसरात शिवाप्रसाद सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्र बनले आहेत. दररोज नवनव्या वेशभूषा करुन लोकांचं लक्ष वेधून घेतात.TDP MP Mr N Shivprasad dressed as Telgu woman protests for special status for Andhra Pradesh... Congress MP Renuka Chaudhary too joins him... @IndiaToday pic.twitter.com/tw9C24sjjf
— Supriya Bhardwaj (@Supriya23bh) March 19, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement